Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लेखकच सिनेमाचा खरा हिरो

लेखकच सिनेमाचा खरा हिरो
सिनेमामध्ये अ‍ॅक्टर-अ‍ॅक्ट्रेस कितीही चांगले असले तरी कथेमध्ये दम असेल, तरच सिनेमा हिट होऊ शकतो. त्यामुळे सिनेमाचे खरे यश हे लेखकावरच अवलंबून असते, असे मत सोनम कपूरने व्यक्त केले आहे. लेखकांना सिनमेच्या यशामध्ये सर्वांत महत्त्वाचे स्थान असते. त्यामुळे त्यांना त्या यशाचे श्रेयही मिळायलाच पाहिजे, असा तिचा आग्रह आहे. सोनम कपूरने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा अगदी सुरुवातीच्या काळातच जेन ऑस्टिनची कादंबरी एमच्या कथेवर आधारित आयशाचा रोल तिला मिळाला होता. त्यामुळे चांगल्या पुस्तकांवर आधारित सिनेमांमध्येच काम करण्याकडे तिचा कल सातत्याने राहिला आहे. लेखक हाच सिनेमाचा रॉकस्टार असतो. सर्वसाधारणपणे सिनेमातील तंत्रज्ञांना त्यांचे योग्य श्रेय दिले जात नाही. कॅमेर्‍याच्या पाठीमागे असलेल्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच आहे. मात्र, त्या सिनेमाचा आत्मा असलेल्या कथेला आणि कथेच्या लेखकाकडे तरी दुर्लक्ष होणे योग्य नाही. त्या लेखकाला त्याचे श्रेय मिळालेच पाहिजे, असे ती म्हणाली. चांगले साहित्य पडद्यावर सिनमेच्या स्वरूपात आणण्यासाठी स्वतः सोनम आता प्रयत्न करणार आहे. तिची प्रोड्युसर बहीण रिया कपूरबरोबर मिळून तिने बॅटल फॉर बिट्टोरा आणि गोविंदा या पुस्तकांचे हक्क तिने विकत घेतले आहेत. यथावकाश तिला या सिनेमांच्या निर्मितीबाबतही निर्णय घ्यायचा आहे. याशिवाय ट्विंकल  खन्नाने लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशनही सोनम कपूरच्या हस्ते होणार आहे. पजामाज आर फोरगिव्हिंग असे या पुस्तकाचे नाव आहे. ट्विंकलने लिहिलेले हे तिसरे पुस्तक असणार आहे. नुसती एन्टरटेन्मेंट करणार्‍या सिनेमांपेक्षा समाजाला काही तरी मौलिक संदेश देणार्‍या सिनेमांमध्ये काम करायला आपल्याला अधिक आवडेल, असेही तिने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोगदाः मायलेकीची कथा