Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कसे निवडाल बाळाचे उबदार कपडे?

कसे निवडाल बाळाचे उबदार कपडे?
, मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (00:40 IST)
छोट्या पाहुण्याचे घरातले आगमन म्हणजे जणू घराला मिळालेली नवसंजीवनी..! बाळाचे आगमन झाल्यानंतर घरातल्या प्रत्येक सदस्याचे काम वाढते. खास करून आजी आजोबा, आई बाबा यांचे.. त्यात सध्या सगळीकडेच सुरू असणारी बोचरी थंडी.. एकतर बाळाला स्वत:ला थंडी वाजते किंवा गरम होते.

यातले काहीच सांगता येत नाही. तुम्ही ज्या कपड्यांत लपेटाल, त्यात बाळराजा सुखी असतो.. आणि म्हणूनच बाळासाठी उबदार, मऊ कपडे निवडणो हे तसं जिकिरीचं ठरतं. थंडीच्या दिवसांत दिवसभर उबदार कपड्यांत लपेटून राहिल्याने मुलांना कोंडल्यासारखे होते, ती चिडीचिडी होतात. अनेकदा आतून गरम होत असते, ईचिंगही होत असते, हे टाळण्याकरिता मुलांना स्वेटर वा गरम कपडे घातल्यानंतर काही वेळाने त्याचा त्रास होत नाही, याची खात्री करावी.

कपडे निवडताना ते आतून दर्जेदार लोकरीचे असावेत. टोचणारे, डिझायनर कपडे मुलांसाठी टाळावेच. अनेकदा लोकर धुतल्यानंतर कडक होते, त्यामुळे मुलांच्या नाजूक त्वचेवर रॅश येऊ शकतो.

स्वेटर फार जड, वजनदार असणार नाही, याची काळजी घेतानाच एकाच ड्रेसमध्ये संपूर्ण अंग झाकले जाईल, याचीही दक्षता घ्यावी. लहानग्यांचे अंग वाढते असते. त्यामुळे एकावेळी भरपूर कपडे घेऊच नका. साधारण पंधरा दिवस ते दोन महिन्यांत मुले वाढतात, हे लक्षात ठेवून गरजेपुरतेच कपडे निवडा.

कपडे निवडताना शांत रंगाचे, फिकट रंगाचे निवडा. डोक्याला बांधायचे रुमाल, स्कार्फ याबाबतही दक्षता घ्या.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भुट्टयाची भेलपूरी