Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Dhanteras 2023 धनत्रयोदशीला या 10 शुभ वस्तू खरेदी करा आणि जीवनात सुख - समृद्धी मिळवा

Dhanteras 2023 धनत्रयोदशीला या 10 शुभ वस्तू खरेदी करा आणि जीवनात सुख - समृद्धी मिळवा
, मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (16:53 IST)
Dhanteras 2023 धनत्रयोदशीला सोनं, चांदी, पितळ्याची भांडी आणि धणे यासह 10 शुभ वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. अखरे या वस्तू का खरेदी केल्या जातात. तसेच या दिवशी काय खरेदी करणे शुभ ठरेल हे जाणून घ्या-
 
1. सोनं : या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. सोने हे लक्ष्मी आणि बृहस्पतीचे प्रतीक आहे, त्यामुळे सोने खरेदी करा.
2. चांदी : या दिवशी चांदी खरेदी करण्याची देखील पद्धत आहे. काही लोक या दिवशी चांदीचे नाणी खरेदी करतात. यावर देवी लक्ष्मी, गणपती आणि कुबरे यांचे चित्र अंकित असतात.
3. भांडी : या दिवशी जुनी भांडी बदलून तांबे, पितळ आणि चांदीची नवीन भांडी क्षमतेनुसार खरेदी केली जातात. पितळेची भांडी लक्ष्मी आणि बृहस्पतिचे प्रतीक आहेत, त्यामुळे या दिवशी सोने खरेदी करणे शक्य नसेल तर पितळेची भांडी नक्कीच खरेदी करा.
4. धणे : या दिवशी ग्रामीण भागात नवीन धणे खरेदी केली जाते, तर शहरी भागात पूजेसाठी संपूर्ण धणे खरेदी केली जाते. या दिवशी धणे बारीक करून त्यात गूळ मिसळून 'नैवेद्य' तयार केला जातो.
5. नवीन वस्त्र : या दिवशी लक्ष्मी पूजनात घालण्यासाठी कपडे खरेदी करण्याची देखील परंपरा आहे.
6. लक्ष्मी-गणपतीची मूर्ती : या दिवशी दिवाळीच्या पूजेसाठी लक्ष्मी आणि गणेशजींच्या मूर्ती किंवा चित्रे खरेदी केली जातात आणि त्याच दिवशी धन्वंतरी पूजेसाठी त्यांची मूर्ती किंवा चित्रेही खरेदी केली जातात.
7. खेळणी : या दिवशी मुलांसाठी खेळणी देखील खरेदी करण्याची परंपरा आहे. घरातील मुलं आनंदी असल्यास घरात सकारात्मक वातावरणाचे निर्माण होते.
8. लाह्या- बत्ताशे : या दिवशी पूजन सामुग्रीसह लाह्या- बत्ताशे खरेदी करण्याची परंपरा आहे.
9. गोमती चक्र आणि कवड्या : या दिवशी मुलांच्या आणि घरातील सर्व सदस्यांच्या सुरक्षेसाठी गोमती चक्र आणि कवड्या खरेदी केल्याने धन समृद्धी येते.
10. झाड़ : या दिवशी केरसुणी किंवा झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. याने वर्षभरासाठी घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते असे समजले जाते.
 
या व्यतिरिक्त दीवा, दक्षिणावर्ती शंख, कमलगट्टा किंवा रुद्राक्ष माळ, धार्मिक साहित्य, औषधं, मीठ, नवीन वाहन किंवा नवीन घर देखील खरेदी करता येऊ शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री दत्त विजय संपूर्ण