कंडेस मिल्क : 200 ग्रॅम
तुप किंवा बटर: अर्धा चमचा
मिल्क पावडर: 3/4 कप
केशर: चार-पाड काड्या
जायफळ पावडर: चिमूटभर
वेलची पूड: अर्धा लहान चमचा
कृती:
मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये कंडेंस मिल्क, मिल्क पावडर आणि तुप मिसळून ठेवून द्या. आता मायक्रोवेव्हला हायवर 1 मिनिटासाठी सेट करुन द्या.
आता यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि केशर मिसळा. 1 मिनिटासाठी अजून चालवा. नंतर बाहेर काढून मिक्स करा. नंतर पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये ठेवून 3 मिनिटासाठी हाय पॉवर वर चालवा आणि काढून बघा की मिश्रण पातळ तर नाहीये. असे असल्यास पुन्हा 30 सेकंदासाठी हाय वर चालवा. मिश्रण घट्ट झाल्यावर बाहेर काढून गार करा आणि याचे पेडे वळून घ्या.
आपण या प्रकारे गॅसवर कढईत देखील पेडे तयार करु शकता.