Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शास्त्रांप्रमाणे भाग्यशाली असते अशी स्त्री

शास्त्रांप्रमाणे भाग्यशाली असते अशी स्त्री
नारीला भारतीय कुटुंबात लक्ष्मीस्वरूप मानले जाते. अन्नपूर्णाने तिला पोषणाचे वरदान दिले आहे. ही फार जुनी सूक्ती आहे की जेथे नारीची पूजा केली जाते तेथे देवता रमणं करतात. वेग वेगळ्या शास्त्रांमध्ये सौभाग्यवती स्त्रीचे काही लक्षण वर्णित आहे. आम्ही जाणून घेऊ काय आहे प्रमुख लक्षण - 
 
मधुर वचन बोलणारी. ज्या स्त्रीची वाणी प्रत्येकासाठी मधुर आणि स्नेहील असते.
आस्तिक, सेवा भावी, क्षमाशील, दानशील, बुद्धिमान, दयावान आणि कर्तव्य पालन करणारी स्त्री लक्ष्मीचा रूप असते.
शरीरापेक्षा हृदयाने सुंदर असणारी स्त्री.
घरी आलेल्या पाहुण्याचा आदर-सत्कार करणारी.
दुसर्‍यांचे दुःख बघून आपल्या सामर्थ्यानुसार मदत करणारी.
स्वयंपाकात भेदभाव न करता सर्वांना एकसारखं भोजन वाढणारी.
दररोज अंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून स्वयंपाकघरात प्रवेश करणारी.
सकाळ-संध्याकाळ देवाला धूप, दीप दाखवून पूजा-पाठ करणारी.
पतिव्रता असणारी.
धर्म आणि नीती मार्गावर चालण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना प्रेरित करणारी.
 

स्त्रिया ज्या असतात अलक्ष्मीचे रूप
* जी स्त्री घाणेरड्या कपड्यांमध्ये राहते.
* जी पाप कर्मांत रत असते, पर पुरुषात जिने मन रमलेलं असत.
* जी प्रत्येक गोष्टीवर राग करते, जी छल-कपट किंवा मिथ्या भाषण करते.
* जी आपल्या घराला सजवून ठेवत नाही, जिचे विचार उत्तम राहत नाही.
* जी आपल्या संतानंशी स्नेह ठेवत नाही.
* जी फक्त आपल्याबद्दल विचार करत असते.
* जी दुसर्र्‍यांच्या घरात भांडण लावण्याच्या फिरकीत असते.
* जी इकडच्या गोष्टी तिकडे करते.
 
सूचना : ही माहिती वेग वेगळ्या शास्त्रांमधून अनुवाद करण्यात आले आहे, ज्याला यथास्वरूप प्रस्तुत करण्यात आले आहे. वेबदुनिया संपादकीय विभागाचे विचार यात सामील नाही आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..