Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या
, गुरूवार, 18 एप्रिल 2024 (07:59 IST)
गुरुवारी ही कामे करावी
पांढरं चंदन, हळद, किंवा गोरोचन ‍चा टिळा लावावा.
प्रत्येक वाईट काम सोडण्यासाठी उत्तम ‍दिवस कारण या दिवशी संकल्प करण्याची अधिकता असते.
गुरुवारी पापांचे प्रायश्‍चित केल्याने पाप नष्ट होतात कारण हा दिवस देवी-देवता आणि त्यांचे गुरु बृहस्पतीचा दिवस आहे.
उत्तर, पूर्व, ईशान दिशेत प्रवास करणे शुभ.
धार्मिक, मांगलिक, प्रशासनिक, शिक्षण आणि पुत्राच्या रचनात्मक कार्यांसाठी हा दिवस शुभ आहे.
सोने आणि तांब्याच्या खरेदी-विक्रीसाठी उत्तम दिवस.
या दिवशी घरात धूप-दीप लावावे, गुग्गुलची धूप देणे अधिक शुभ.
या दिवशी घरात धूप दिल्याने गृह कलह, ताण आणि अनिद्रा पासून मुक्ती मिळते. कार्यांत यश मिळतं सोबतच मेंदू शांत राहण्यास मदत होते.
सर्वात विशेष म्हणजे या दिवशी धूप दिल्याने पारलौकिक मदद मिळते.
गुरु अशुभ किंवा कमजोर असल्यास पिंपळाच्या झाडाला पाणी द्यावे.
गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे सेवन करावे.
 
गुरुवारी काय काम टाळावे
या दिवशी शेव्हिंग करणे टाळावे.
शरीराच्या कोणत्याही भागाचे केस कापू नये नाहीतर संतान सुखात अडथळे येतात.
दक्षिण, पूर्व, नैऋत्य दिशेत प्रवास करु नये.
गुरुवार मीठ खाऊ नये. याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि प्रत्येक कार्यात अडथळे ‍निर्माण होतात.
या दिवशी दूध आणि केळी खाणे वर्ज्य मानले गेले आहे.
या दिवशी कपडे धुणे, लादी पुसणे देखील वर्ज्य मानले गेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mahavir Jayanti 2024 : कधी आहे महावीर जयंती