Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठीत सूर्योपासना कशी करावी

मराठीत सूर्योपासना कशी करावी

वेबदुनिया

सूर्य आपल्याला केवळ प्रकाशच देतो असे नाही, तर आपण आहोत त्याला बऱ्याच अंशी सूर्य कारणीभूत आहे. म्हणूनच या सहस्त्ररश्मीबद्दल कृतज्ञताभाव त्याची पूजा करून व्यक्त केला पाहिजे. त्यासाठी रोज सूर्योदयापूर्वी स्नानादी कार्ये आटोपली पाहिजेत. सूर्योदय झाल्यानंतर त्या भास्कराच्या समोर नतमस्तक होऊन डोळे मिटून त्याची प्रार्थना करा. जे तत्व सूर्यात आहे, ते माझ्यातही आहे, असे म्हणून डोळे उघडा. त्यानंतर खालील मंत्र म्हणा.

ॐ मित्राय नमः। - ॐ रवये नमः।
ॐ सूर्याय नमः। - ॐ भानवे नमः।
ॐ खगाय नमः। - ॐ पुष्णे नमः।
ॐ हिरण्यगर्भाय नमः। - ॐ मरिचये नमः।
ॐ आदित्याय नमः। - ॐ सवित्रे नमः।
ॐ अर्काय नमः। - ॐ भास्कराय नमः।
ॐ श्री सवितृ सूर्यनारायणाय नमः।

अशा प्रकारे सूर्याची पूजा- अर्चना केल्याने बरेच लाभ होतात. त्याच्या कोवळ्या प्रकाशाच्या माध्यमातून डी जीवनसत्व आपल्याला मिळते. शिवाय त्याच्या पराक्रमी रूपाकडे पाहून आपल्यात चेतना संचारते.

रोज सकाळी तांब्याच्या लोटीमध्ये शुद्ध पाणी घ्या. त्यानंतर सूर्याच्या समोर उभे राहून दोन्ही हातांनी लोट्याला उंच उचलून सूर्याला अर्घ्य अर्पण करा. म्हणजे त्यातील पाणी काली सोडून द्या. अर्घ्याच्या पाण्यात लाल फुले, अक्षता, कुंकू हेही टाकावे.
अर्घ्य वाहताना खालील मंत्र म्हणून संकल्प सोडावा.

एहि सूर्य! सहस्त्रांशो! तेजो राशे! जगत्पते!
अनुकम्प्यं मां भक्त्या गृहाणार्घ्य दिवाक

भावार्थ- हे सहस्त्रांशो, हे ते जो राशे, हे जगत्पते, माझ्यावर कृपा करा. मी श्रद्धापूर्वक अर्पण केलेले हे अर्घ्य स्वीकारा.

त्याचप्रमाणे खालील मंत्रांमध्येही सूर्याला आवाहन केले आहे. या मंत्रामध्येही दिव्य शक्ती आहे.

ॐ आरोग्य प्रदायकाय सूर्याय नमः।
ॐ हीं हीं सूर्याय नमः। ॐ आदित्याय नमः।
ॐ घ्रणि सूर्याय नम

अशा प्रकारे सूर्य नमस्कार व सूर्योपासनेद्वारे शरीराला निरोगी, सुखी व समृद्ध बनविता येते. त्यासाठी सूर्योपासना जरूरीची आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठीत श्री हनुमान चालिसा (पाहा व्हिडिओ)