आपल्या देशातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु जाहले आहे. देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये, तर महाराष्ट्रात 7 मतदारसंघांमध्ये आज मतदान सुरु आहे. पूर्ण जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकांना आता सुरुवात झाली. पूर्ण जगाचं लक्ष भारतातील लोकसभा निवडणुकांकडे आहे. भारताच्या लोकसभा निवडणुकांची दखल घेत गुगलनेही भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
गुगलने एका खास डुडलच्या माध्यमातून लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यास सांगितले आहे. यामध्ये मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीला आपल्या डुडलमध्ये स्थान दिलंय. गुगलकडून लोकांना मतदान केंद्रावर जा व मतदान करा असे आवाहन केले आहे. तुम्ही कशाप्रकारे मतदान करु शकता याबाबतची संपूर्ण प्रक्रियाही सांगण्यात आली आहे.