Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीयांनी हे शोधले गुगलवर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल

भारतीयांनी हे शोधले गुगलवर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल
, शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (09:36 IST)
भारतीय लोक जगात सर्वाधिक नेट आणि डेटा वापर करतात, त्यामुळे अनेक गोष्टी ते शोधात असतात, याचा अहवाला गुगलने प्रसिद्ध केला आहे. भारतीयांनी या वर्षी सर्वाधिक वेळा गुगलवर सर्च केलेला प्रश्न होता, ‘How to send Stickers in WhatsApp’. ५ कोटींहून अधिक व्हॉट्सअप युझर्स असणाऱ्या भारतामध्ये व्हॉट्सअपच्या या नवीन फिचरबद्दल सर्वाधिक उत्सुकता होती हेच गुगलच्या अहवालातून दिसून आले आहे.
 
भारतीयांनी How To या कॅटेगरी मध्ये विचारलेला दुसरा सर्वाधिक लोकप्रिय प्रश्न होता, ‘How to link Aadhaar with Mobile number.’ आधार कार्ड क्रमांक मोबाइल क्रमांकाशी संलग्न करणे हे काही महिन्यांपूर्वी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र सर्वोच्च न्यायलयाने आधार कार्डशी संबंधित माहिती खाजगी कंपन्या मागू शकत नाही असा निर्णय दिल्यानंतर ही अट रद्द करण्यात आली. जीओ फोन्सबद्दही मोठ्या प्रमणात  गुगलला  प्रश्न विचारले. यामध्ये ‘How to Set Ringtone in Jio Phone’,‘How to use whatsapp on Jio Phone’,‘How to send Stickers on WhatsApp in Jio Phone’ या सारख्या प्रश्नांचा समावेश आहे. सोबत  सर्वाधिक ट्रेण्डींग फोन्सच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर वन प्लस सिक्स, दुसऱ्या क्रमांकावर व्हिवो व्ही ९, तिसऱ्या क्रमांकावर रिअलमी २ प्रो, चौथ्या रेडमी नोट फाइव्ह, पाचव्या क्रमांकावर ओप्पो एफ ९ प्रो, सहाव्या क्रमांकावर रेडमी नोट फाइव्ह प्रो, सातव्या क्रमांकावर एमआय ए वन, आठव्या क्रमांकावर रिअलमी टू, नवव्या क्रमांकावर एमआय ए टू तर दहाव्या क्रमांकावर रेडमी नोट सिक्स प्रो या फोनचा समावेश आहे.भारतीयांनी सर्वाधिक सर्च केलेल्या गॅजेट्सची यादी पुढील प्रमाणे (अनुक्रमे): गुगल होम, गोप्रो हिरो, अॅपल एअरपॉड्स, अॅपल वॉच सिरीज फोर, फिटबीट व्हर्सा, सोनी ए सेव्हन ट्रीपल आय कॅमेरा, जबरा एलिट ६५ टी, बोस साऊण्डसपोर्ट फ्री, गोप्रो फ्युजन, अॅमेझॉन इको स्पॉट. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल व मोदी या दोघांना इंटरनेट विश्वात सर्वाधिक शोधले आपल्या देशात