Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जगातल्या सगळ्यांत महागड्या व्हिस्कीची किंमत ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल

whiskey
, मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (10:20 IST)
एका लिलावात एका व्हिस्कीची बाटली तब्बल 22 कोटी 50 लाख रुपयांन विकली गेली आहे. हो. तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. व्हिस्कीची किंमत 22 कोटी रुपये.सॉथबे या कंपनीने या व्हिस्कीचा लिलाव केला. मॅकलन 1926 सिंगल मॉल्ट ही व्हिस्की जगातील सर्वांत जास्त मागणी असलेली व्हिस्की आहे.
 
सॉथबे या कंपनीने शनिवारी या व्हिस्कीचा लिलाव केला आहे. अंदाजापेक्षा दुपटीने या व्हिस्कीचा लिलाव झाला.
 
या व्हिस्कीचा लिलाव करणाऱ्या कंपनीने सांगितलं की लिलाव होण्याच्या आधी या व्हिस्कीचा अगदी छोटा थेंब त्यांना चाखायला मिळाला.
 
“ही अतिशय श्रीमंत व्हिस्की आहे. त्यात सुकवलेली बरीच फळं आहेत. त्याची चव छान आहे,” असं जॉनी फॉवल यांनी AFP या वृत्तसंस्थेला सांगितलं.
 
ही व्हिस्की मॅच्युअर व्हायला 60 वर्षं लागली. 1986 ती बाटलीबंद करण्यात आली. या व्हिस्कीच्या फक्त 40 बाटल्या उत्पादित करण्यात आल्या आहेत.
 
या 40 बाटल्या विकण्यासाठी ठेवल्या नव्हत्या. तर त्या मॅकलन कंपनीच्या टॉप क्लायंट्सला देण्यात आल्या होत्या.
 
गेल्या अनेक वर्षांत जेव्हा या बाटल्यांचा लिलाव होतो तेव्हा उत्तम किमतीला विकल्या जातात. 2019 मध्ये असाच लिलाव झाला तेव्हा ही बाटली 15 कोटी रुपयांना विकली गेली होती.
 
आता नुकत्याच झालेल्या लिलावाच्यासंदर्भात मागच्या महिन्यात बोलताना फॉवल म्हणाले की, मॅकलन 1926 ही व्हिस्की लिलाव करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लिलाव करायची असते तर प्रत्येक संग्राहकाला स्वत:कडे ही बाटली हवी असते.
 
सॉथबेज कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 1926 च्या बॅचचच्या चाळीस बाटल्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नाव देण्यात आलं आहे.
 
दोन बाटल्यांना अजिबात नाव देण्यात आलेलं नाही. 14 बाटल्यांना एक दुर्मिळ नाव देण्यात आलं आहे. 12 बाटल्यांना पॉप गायक सर पीटर ब्लाके यांचं नाव देण्यात आलं आहे.
 
इतर 12 बाटल्यांचं डिझाईन इटालियन पेंटर वॅलेरियो अदामी यांनी केलं आहे. काल लिलावात विकलेली गेलेली बाटली याच 12 बाटल्यांमधील एक होती.
 
या 12 बाटल्यांपैकी किती बाटल्या अद्याप त्यांच्याकडे आहेत याचा आकडा कळलेला नाही.
 
एक बाटली 2011 साली जपानच्या भूकंपात उद्धवस्त झाली आणि एक बाटली उघडली आणि काही भाग गट्टम करण्यात आल्याची माहिती आहे.
 
 















Published By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : 40 मजुरांचा पहिला व्हीडिओ जारी, संपर्क साधण्याच्या प्रयत्नांना यश