Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

4 जून रोजी भारत जिंकेल, भारताचे विरोधक हरतील पंतप्रधान मोदींचा काँग्रेस वर निशाणा

narendra modi
, शुक्रवार, 10 मे 2024 (22:25 IST)
पंतप्रधान मोदींनी हैद्राबाद मध्ये निवडणूक सभेला संबोधित करत काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले 4 जूनचे निकाल स्पष्ट झाले असून 4 जून ला 140 कोटी भारतीयांचा संकल्प जिंकेल आणि भारताचे विरोधक हरतील.  4 जूनला CAA, UCC चे विरोधक हरतील, 
 
पंतप्रधान मोदी म्हणाले - "भारत आज एक डिजिटल शक्ती आहे, एक फिनटेक शक्ती आहे, एक स्टार्टअप शक्ती आहे, एक अंतराळ शक्ती आहे - हा मोदींचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, परंतु काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे? काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. तुष्टीकरण, कुटुंब प्रथम, दहशतवादी
 
तेलंगणात काँग्रेसचे सरकार आल्यापासून आरआर टॅक्सची खूप चर्चा होतेएक आर तेलंगणाचा आणि एक आर दिल्लीचा, त्यांनी मिळून तेलंगणाला एटीएम बनवले आहे.इथे हैद्राबादमध्ये तुम्हाला RRR टॅक्सचा बोजा सोसावा लागतोय.
 
काँग्रेस तुष्टीकरणासाठी काहीही करू शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. इथे हैदराबादमध्येही AIMIM ला सूट देण्यात आली आहे.

वोट बँक नाराज होण्याच्या भीतीमुळे काँग्रेस किंवा बीआरएस दोघांनाही हैदराबाद मुक्ति दिन साजरा करायचा नाही, पण आता हैदराबादला या भीतीतून मुक्त करण्याचा भाजपचा निर्धार आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ति दिन साजरा केला जाईल.

Edited By- Priya Dixit   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुढील चार दिवस पावसाची शक्यता, पुण्यासह या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट