Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संविधान वरून विरोधक जनतेची दिशाभूल करत आहे, नितीन गडकरींचा विरोधकांवर हल्लाबोल

nitin
, शुक्रवार, 10 मे 2024 (20:04 IST)
सध्या देशात निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये तीन टप्प्यात मतदान झाले आहे आणि अजून अनेक राज्यांमध्ये मतदान व्हायचे आहे. सर्वत्र प्रचार जोमानं सुरु आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते वेगवेगळ्या राज्यात दौरे करत असून सभा घेत आहे.  विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. 
शुक्रवारी भाजप नेते नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला. 
 
महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पकंजा मुंडे यांच्या समर्थनार्थ केंद्रीय मंत्री प्रचारासाठी आले होते. यावेळी एका निवडणूक सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यास राज्यघटना बदलेल, असे विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की, संविधान बदलता येणार नाही, त्यात फक्त दुरुस्ती केली जाऊ शकते. काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात आतापर्यंत 80 वेळा घटनादुरुस्ती केली आहे. काँग्रेसच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील जनता गरीबच राहिली आहे.

60 वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसने काहीही केले नाही.आम्ही 10 वर्षे जनतेसाठी काम केले संविधानला घेऊन विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत.

जात-धर्माच्या आधारावर मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. बीडमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे. मुंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार बरजंग सोनवणे यांच्यात लढत आहे.

Edited By- Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिओने नवीन 'OTT स्ट्रीमिंग प्लॅन' लाँच केला, 888 रुपयांमध्ये 15 OTT ॲप्स उपलब्ध