Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजपासून मतदान सुरु!

आजपासून मतदान सुरु!
, शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (11:56 IST)
आजपासून पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच मतदारसंघातील बँका बंद राहतील पण ऑनलाईन बँकेचे कामकाज सुरु राहील. ग्राहक ऑनलाईन बँकेचे व्यवहार करू शकतील. लोकसभेची निवडूक 2024 आज होत आहे. आज देशातील 21 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशमधील 102 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये विदर्भामधील रामटेक, भंडारा, गोंदिया, नागपुर, चंद्रपूर, गडचिरोलीचिमूर महाराष्ट्रातील या मतदारसंघाचा सहभाग आहे. 
 
लोकसभा निवडणूक 2024 हे मतदान सकाळी सात वाजता सुरु होईल ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालेल. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक हॉलीडे कॅलेंडरनुसार चेन्नई, आगरताळ, आयझोल, इटानगर, इंफाळ, डेहराडून, कोहिमा, जयपूर, शिलॉंग आणि नागपूर येथील सार्वजनिक आणि खाजगी बँका बंद राहतील. आज पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असल्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी बँका बंद तर राहतील पण ऑनलाईन सेवा ग्राहकांसाठी सुरु राहील. ग्राहक आवश्यक व्यावहार ऑनलाईन करू  शकतील.
 
सात पैकी पहिल्या टप्प्यात आज मतदान होईल. महाराष्ट्र 5 जागा, आसाम 2 जागा, अरुणाचल प्रदेश 2 जागा, बिहार 4 जागा, छत्तीसगड 1 जागा, मध्यप्रदेश 6 जागा, मणिपूर 2 जागा, मेघालय 2 जागा, नागालँड 1 जागा, मिझोराम 1 जागा, सिक्कीम 1 जागा, राजस्थान 12 जागा, त्रिपुरा 1 जागा, तामिळनाडू 39 जागा, पश्चिम बंगाल 3 जागा, उत्तराखंड 5 जागा, जम्मू काश्मीर 1 जागा, अंदमान निकोबार 1 जागा, पॉंडेचरी 1 जागा, लक्षद्वीप 1 जागा या राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान आज होणार आहे. 
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संजय राऊत यांची जीभ घसरली, भाजप उमेदवार नवनीत राणा यांना मंचावरून 'डान्सर' म्हटले