Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीएसएनएल देणार मोबाईल अॅपवर कॉल सुविधा

बीएसएनएल देणार मोबाईल अॅपवर कॉल सुविधा
, गुरूवार, 12 जुलै 2018 (08:43 IST)
बीएसएनएल ग्राहक कंपनीच्या विंग्स (Wings)मोबाईल अॅपच्यामाध्यमातून देशात कोणत्याही नंबरवर कॉल करु शकतात. याआधी पहिल्यांदा मोबाईल अॅपवर कॉल करण्याची सुविधा कोणत्याही अॅपवर नाही. 
 
सध्याच्या स्पर्धात्मक युगात या नव्या सेवेमुळे बाजारात बीएसएनएलच्या हिस्सेदारीत वाढ होईल, असा विश्वास दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी व्यक्त केला. इंटरनेट टेलिफोन सेवा सुरु करण्यासाठी बीएसएनएलच्या व्यवस्थापनाचे  मी अभिनंदन करतो, असे सिन्हा म्हणालेत. ही सेवा वापरकर्त्यांना कॉलशिवाय कॉल करण्याची अनुमती देईल. या सेवेचा उपयोग करुन, बीएसएनएलचे ग्राहक देशातील कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यास सक्षम असतील. बीएसएनएल वाय-फाय किंवा कोणत्याही अन्य सेवा ग्राहक इंटरनेटचा वापर करु शकतात. दूरसंचार विभागाने हा निर्णय घेतला असून दूरसंचार आयोगाने कंपनीने अॅप आधारित कॉल सेवा सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. या सेवेसाठी नोंदणी या आठवड्यात सुरू होईल आणि सेवा २५ जुलै रोजी सक्रिय करणे सुरु होईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जयपूरमध्ये १४ आणि १५ जुलैला इंटरनेट सेवा बंद