Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

350 रुपयांत घरीच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

350 रुपयांत घरीच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स
नवी दिल्ली , मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018 (12:45 IST)
गाडी चालवण्यासाठी चालकांचे लायसन्स असणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र हेच लायसन्स काढण्यासाठी पूर्ण करावी लागणारी सरकारी यंत्रणा पाहिली तर अक्षरशः डोक्याला तापच असतो. यामुळे अनेक चालक याकडे दुर्लक्ष करत असतात. अशा चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या योजनेनुसार आता हे लायसन्स घरीच मिळवता येणार आहे. केवळ 350 रुपयांत हे लायसन्स मिळवता येणार आहे. या बाबतची प्रक्रिया पुढीलप्राणे आहे
 
असा दाखल करा अर्ज
केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेनुसार चालकाला आपल्या घरीच बसून लायसन्स काढता येणार आहे. आपल्या लायसन्ससाठी शहरातील आरटीओ ऑफिसमध्ये ऑनलाइन अर्ज दाखल करा. हे करण्यासाठी आपणास पहिल्यांदा https://parivahan.gov.in/ या साईटवर लॉग इन करावे लागेल. यानंतर या साईटवर गेल्यानंतर आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स विभागाला क्लिक करावे लागेल. तर नंतर सर्व प्रक्रियानुसार आपल्याला हा अर्ज भरता येणार आहे.  
 
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी दलालाकडून मनमानी रक्कम आकारली जाते. लायसन्स लवकरात लवकर मिळण्यासाठी आपण देखील ही रक्कम देऊन टाकतो. मात्र या योजनेमुळे आपणास केवळ 350 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. हे शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर आपल्या मोबाइलवर एक संदेश (मेसेज) येईल. यामध्ये आपल्याला ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची तारीख, ठिकाण, आणि वेळ देखील समजेल. या सर्व प्रक्रियानंतर 15 दिवसात आपल्या पत्त्यावर हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काँग्रेस संस्कृतीमुळे देशाचे मोठे नुकसान