Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘अग्निपंख’ची टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

‘अग्निपंख’ची टीम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
‘अग्निपंख’ या अग्निशमन दलावरील पहिल्या भारतीय ॲक्शनपटाच्या टीमने मुहूर्तापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. निर्मात्या रुतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड आणि अभिजीत गायकवाड यांनी अग्निपंखच्या बहुचर्चित पहिल्या टीझर पोस्टरची प्रतिमा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली. पटकथा लेखक सचिन दरेकर यांनी चित्रपटाचा घटनापट मुख्यमंत्र्यांसमोर उलगडला तसेच दिग्दर्शक गणेश कदम यांनी या चित्रपटाच्या भव्यतेविषयी तसेच चित्रीकरणातील तांत्रिक गोष्टींबाबत माहिती दिली.
 
आजवर सैन्यदल तसेच पोलीस दलावर आधारित अनेक सिनेमे आले परंतु माध्यमांमध्ये आणि जनमानसात तुलनेने दुर्लक्षित राहिले आहे. कशाचिही पर्वा न करता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत जीवची बाजी लावून मोहिम फत्ते करणाऱ्या अग्निशमन दलाची शौर्यगाथा इतक्या भव्य प्रमाणात भारतात प्रथमच आणि तेही मराठीत येत असल्याचे ऐकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अग्निपंखच्या टीमचे कौतुक केले व आपल्यालाही अभिमान वाटल्याचे सांगितले. या अभिमानास्पद चित्रपटाचा एकूण आवाका लक्षात घेता, आवश्यक असलेल्या बाबींसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देताना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
webdunia
या प्रसंगी निर्मात्या रुतुजा गायकवाड-बजाज, अनिल गायकवाड, अभिजीत गायकवाड, दिग्दर्शक गणेश कदम, पटकथा-संवाद लेखक सचिन दरेकर आणि जनसंपर्क अधिकारी मयूर आडकर उपस्थित होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी कौतुकाने पाठ थोपटल्याने अग्निपंखच्या टीमचा उत्साह आणखी वाढला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

…आणि संतोषला वाटले 'भूत' आला !