बस आणि रेल्वे शिवाय येण्याजाण्यासाठी दूसरे साधन आहे विमान. विमानाचा प्रवास जरी बस आणि रेल्वे पेक्षा महाग आहे. पण विमानमुळे तुमचा प्रवास लवकर संपतो. विमानात बसण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. तसेच जगामध्ये असे काही ठिकाण आहे, ज्यांच्या वरुन विमान जात नाही. तर चला हे ठिकाण कोणते आहे जाणून घ्या. ज्यांना नो फ्लाय झोन एरिया म्हटले जाते.
तिब्बत- तिब्बत जगातील सर्वात ऊंच जागा आहे. ज्यावरून विमानाला जायला परवानगी नाही. तिब्बतची ऊंची 16000 फुट आहे. इथे फक्त काही कमर्शियल फ्लाइटला खूप उंचावरून जाण्याची परवानगी आहे. या ठिकाणाला नो फ्लाय झोन बोलले जाते.
माचू पिचू- जगातील सर्वात खास जागा माचू पिचू असून तिथे विमानाला वरुन जाण्याची परवानगी नाही. हे ठिकाण नो फ्लाय झोन आहे. कारण इथे असे काही रोप-झाड आणि जीव आहे जे पृथ्वीवर दुसरीकडे कुठेच नाही. इथली इकोसिस्टिमला वाचवण्यासाठी या ठिकाणाला नो फ्लाय झोन एरिया घोषित केले आहे.
ताजमहल- सात आश्चर्यांपैकी एक ताजमहल ज्याला 2006 मध्ये नो फ्लाय झोन एरिया घोषित केले आहे. ताजमहल वरून विमानाला उडण्याची परवानगी नाही.
मक्का- इस्लाम धर्माचे प्रमुख धर्म स्थळ मक्का यावरून विमानास जायची परवानगी नाही. साऊदी अरबच्या सरकारने मक्काला येणाऱ्या लोकांची सुरक्षितता आणि धर्म स्थळाची विशेषता पाहून याला नो फ्लाय झोन एरिया घोषित केले आहे.
बकिंघम पॅलेस- यूनाइटेड किंगडम स्थित बकिंघम पॅलेस पण नो फ्लाय झोन एरियाच्या यादीत सहभागी आहे. हे ब्रिटनचे शाही घराणे आणि कार्यालय आहे. जिथे ब्रिटनचे राजा आणि राणी राहतात. याला नो फ्लाय झोन एरिया घोषित केले आहे
डिज्नी पार्क- लहानपणी तुम्ही सर्वांनी मिक्की माउस कार्टून मध्ये डिज्नी पार्क पहायला असेल. हा डिज्नी पार्क एरिया नो फ्लाय झोन एरिया आहे. कैलिफोर्नियाच्या डिज्नीलैंड आणि फ्लोरिडाच्या वाल्ट डिज्नी वर्ल्डच्या 3000 फुट वरती कुठल्याही विमानाला आणि हेलीकॉप्टरला वरुन जाण्याची परवानगी नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik