Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Increase Sperm Count Naturally स्पर्म काउंट आणि क्वालिटी वाढवण्यासाठी खावे हे 7 सुपरफूड्स

Increase Sperm Count Naturally स्पर्म काउंट आणि क्वालिटी वाढवण्यासाठी खावे हे 7 सुपरफूड्स
Increase Sperm Count Naturally पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी झाल्याने त्यांच्या फर्टिलिटीवर प्रभाव पडतो. आज आम्ही येथे 7 अशा फूड्सबद्दल सांगत आहोत ज्याचा दररोज वापर केल्याने पुरुषांमध्ये स्पर्म काउंट वाढेल ज्याने प्रजनन क्षमता वाढेल.
 
1. डाळिंब - रिसर्चप्रमाणे डाळिंबाचा रस स्पर्म काउंट आणि क्वालिटी वाढवण्यास मदत करतं. दररोज एक ग्लास डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने प्रजनन क्षमता वाढते.
 
2. टोमॅटो - यामध्ये असलेले लाइकोपीन शुक्राणूंची संख्या, गुणवत्ता आणि रचना सुधारते. ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेले टोमॅटो खाणे खूप फायदेशीर आहे.
 
3. अक्रोड - यामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अॅसिड पुरुषांच्या अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करतात. दररोज मूठभर (75 ग्रॅम) अक्रोड खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या आणि आकार सुधारतो.
 
4. अंडी - प्रथिने आणि व्हिटॅमिन ई समृध्द असलेल्या अंडी निरोगी आणि मजबूत शुक्राणूंच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहेत. रोज नाश्त्यात दोन अंडी खाल्ल्याने हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
 
5. लसूण - यामध्ये असलेले एलिसिन नावाचे संयुग पुरुषांच्या अवयवामध्ये रक्त प्रवाह वाढवते. दररोज सकाळी लसणाच्या 3-4 पाकळ्या चघळल्याने वीर्याचे प्रमाण वाढते.
 
6. केळी - यामध्ये असलेले ब्रोमेलेन आणि व्हिटॅमिन बी नावाचे एन्झाइम स्टॅमिना, एनर्जी आणि स्पर्म काउंट वाढवतात. रोज सकाळ संध्याकाळ केळी खाल्ल्याने शक्ती मिळते.
 
7. भोपळ्याच्या बिया - यामध्ये असलेले झिंक आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स पुरुषांच्या अवयवांमध्ये रक्ताभिसरण वाढवतात. दररोज मूठभर भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन आणि शुक्राणूंची संख्या वाढते.
 
या व्यतिरिक्त आपण दररोजच्या आहारात गाजर-पालक याचा देखील समावेश करु शकता. गाजरात आढळणारे व्हिटॅमिन A शुक्राणूंची निर्मिती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तर पालकात फॉलिक अॅसिड आढळतं ज्याने स्पर्मची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. तसेच डार्क चॉकलेट याचे सेवन करणेही फायद्याचे ठरु शकतं कारण यामध्ये असलेले एल-आर्जिनिन नावाचे अमिनो अॅसिड शुक्राणूंची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज गोकुळात रंग खेळतो हरी