* असे कार्य करणे टाळा जे करण्यासाठी खूप वेळ लागत असून कार्यक्षमता कमी होत असेल. अशाने वेळही वाया जातो आणि काही नवीन शिकायलाही मिळत नाही.
* ऑफिसहून निघाल्यावर इ-मेल चेक करणे टाळा. जर घरातून काम करणे आवश्यक असेल तरी त्याचा वेळ निर्धारित करा.
* सूपरमॅन किंवा सूपरवूमन बनण्याचा प्रयत्न करू नका. अधिक काम असल्यास मित्र किंवा कुटुंबाची मदत घ्या किंवा काही पैसे खर्च करून काही काम परभारे होत असतील तर तसे पाहा.
* सर्व आवश्यक कार्यांची प्राथमिकतेप्रमाणे लिस्ट तयार करा. लिस्टमध्ये ते काम करण्याची वेळही लिहा ज्याने सर्वकाही व्यवस्थित पार पडेल.
* असे काम करायला स्पष्ट नकार द्या जे दिलेल्या वेळेत पूर्ण करणे संभव नसेल. त्यासाठी आपण आधीच अतिरिक्त वेळ देण्याची अट ठेवा.
* संधी मिळाल्याबरोबर कुटुंब किंवा मित्रांसह फेरफटाका करण्यासाठी निघून जा. कुटुंबातील विशेष दिवस लक्षात ठेवून ते साजरे करा.
* कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघणे योग्य नाही. अशात ताण निर्माण होतो आणि हवी तशी गुणवत्ता देणेही कठीण जातं.
* आहाराकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. भरपूर झोप घ्या. रोज कमीच का नसो पण वॉकसाठी किंवा व्यायामासाठी वेळ काढा. याने 40 टक्के ताण कमी होण्यात मदत मिळते.