Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अक्षय तृतीयेला बनवा आमरस पुरी

अक्षय तृतीयेला बनवा आमरस पुरी
, शुक्रवार, 10 मे 2024 (05:41 IST)
अक्षय्य तृतीयेचा सण विशेष मानला जातो. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी लोक सोन्या-चांदीची खरेदी करतात. दान-धर्म करतात आणि भगवान विष्णूची पूजा करतात. या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण करण्याची देखील पद्धत असते. या दिवशी तुम्ही तुमच्या घरी काही पारंपारिक पदार्थ बनवू शकता आणि त्या अर्पण करण्याबरोबरच ते तुमच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना खाऊ घालू शकता. तर चला या दिवशी तयार करण्यासाठी खास आमरस पुरी थाळी रेसिपी नोट करा- 
 
सामग्री- 4 मध्यम आकाराचे आंबे, 1 लहान ग्लास दूध, वेलची पूड, केशर, साखर आवडीप्रमाणे (आंबा गोड असल्यास गरज नाही)
पुरीसाठी साहित्य- 1 कप कणिक, मीठ आणि तेल
 
कृती- आंबे धुऊन त्याचे लहान-लहान तुकडे करुन मिक्सरच्या जारमध्ये साखर आणि दुधासोबत ग्राइंड करुन घ्यावे. त्यात वेलचीपूड आणि केशर घालून मिसळावे. रस आवडीप्रमाणे घट्ट किंवा सैल ठेवू शकता.
कणिकमध्ये दोन मोठे चमचे तेल घालावे आणि मग चवीप्रमाणे मीठ घालून पाण्याने चांगले मळून घ्यावे. लहान-लहान गोळे तयार करुन घ्यावे. कढईत तेल गरम करावे आणि पुरी लाटून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावी. गरमागरम पुर्‍या आंब्याच्या रसासोबत सर्व्ह कराव्यात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अक्षय तृतीया संपूर्ण माहिती