Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वास्तुनुसार असे असावे 'पूजा गृह'

वास्तुनुसार असे असावे 'पूजा गृह'
'देऊळ किंवा पूजागृह इमारतीच्या ईशान्येस असावे. जर ते एखाद्या ओटल्यावर असेल तर त्यास टेबल किंवा स्टूल सारख्या चार खांबी आधारावर टेकवून ठेवले पाहिजे.
 
सगळे फोटो आणि मूर्त्या पूर्वेकडे किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करूनच ठेवाव्यात. 
 
गणपती, श्रीलक्ष्मी आणि सरस्वती यांची उभ्या आविर्भातील मूर्ती किंवा फोटो कधीही ठेऊ नका. मूर्तींना संस्कारित करण्यापूर्वी उत्तरायण आणि दक्षिणायन नक्की पाहा. 
 
उग्र, तापट स्वभावाचे देवता जसे भैरव, नरसिंह आणि दुर्गा यांना दक्षिणायनाच्या काळात स्थापित किंवा संस्कारित कराव्या. 
 
पूजागृहात देवता कधीही कोपर्‍यात ठोऊ नका. पूजागृहात किंवा देवळात भंगलेली मूर्ती ठेवण्यात येऊ नाही. पूजागृहाचे दार उत्तर किंवा पूर्वेकडच्या भिंतीत असावे.
 
बहुमाळ्याच्या इमारतीत प्रार्थनागृह वरच्या माळ्यावर न राखता तळघरात असावे. पूजागृहाकरता पांढरा किंवा पिवळा रंग शुभलक्षणी समजला जातो.
 
पूजागृहाच्या जवळपास वाहणा वगैरे पसरलेल्या नसाव्या, त्यामुळे कुटुंबात कलह वाढण्याची शक्यता आहे. पूजागृहात कोणतीही टाकाऊ सामुग्री नसावी. पूजागृहाच्या वर किंवा खाली टॉयलेट्स नसावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दैनिक राशीफल (21.05.2018)