Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आर्थिक नुकसानीचे कारण बनतात हे 5 वास्तुदोष

आर्थिक नुकसानीचे कारण बनतात हे 5 वास्तुदोष
बरेच लोक कितीही प्रयत्न करतात तरी त्यांच्याजवळ धन टिकत नाही. न कळत त्यांना सतत नुकसान सहन करावे लागते. पण ह्याचे कारण समजणे फारच अवघड होऊन जाते. बर्‍याच वेळा सतत पैशांचे नुकसान होण्यामागे वास्तुदोष देखील असू शकतो.
 
वास्तूच्या या 5 कारणांना लक्षात ठेवून पैशांच्या नुकसानीपासून स्वत:चा बचाव करू शकता.
 
1. धन ठेवण्याची दिशा
धनात वृद्धी आणि बचत करण्यासाठी तिजोरी किंवा अल्मारी ज्यात धन ठेवतो, त्याला दक्षिण दिशेत या प्रकारे ठेवावे की त्याचे तोंड उत्तर दिशेकडे असायला पाहिजे. धनवाढ साठी तिजोरीचे तोंड उत्तर दिशेकडे ठेवणे चांगले मानले जाते.
 
2. नळातून पाणी गळणे  
घरातील नळातून पाणी गळणे सामान्य बाब असते. म्हणून बरेच लोक याकडे लक्ष्य देत नाही, पण नळातून पाणी गळणे देखील वास्तुशास्त्रात   आर्थिक नुकसानीचे मोठे कारण मानण्यात आले आहे. वास्तूच्या नियमानुसार, नळातून पाणी गळणे अर्थात हळू हळू पेशे खर्च होण्याचे संकेत आहे.  म्हणून जेव्हा नळात खराबी आली तर लगेचच त्याला बदलायला पाहिजे.
 
3. बेडरूममध्ये लावा धातूच्या वस्तू 
बेडरूममध्ये गेटच्या समोरच्या भिंतीच्या डाव्या कोपर्‍यात धातूची एखादी वस्तू लटकवायला पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार ही जागा भाग्य आणि संपत्तीची असते. या दिशेत भिंतीत क्रेक नसायला पाहिजे अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
 
4. घरात कचरा नाही ठेवायला पाहिजे 
घरात तुटके फुटके भांडे नाही ठेवायला पाहिजे त्याने घरात नेगेटिव ऊर्जा येते. तुटलेला पलंग, अल्मारी किंवा लाकडाचे इतर सामान देखील नाही ठेवायला पाहिजे याने आर्थिक लाभात कमतरता येते आणि खर्चात वाढ होते. छत किंवा पायर्‍यांच्या खाली कबाड जमा केल्याने देखील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
 
5 पाण्याचे निकासीकडे ही लक्ष्य ठेवणे गरजेचे 
वास्तुशास्त्रानुसार पाण्याची निकासी बर्‍याच गोष्टींना प्रभावित करते. ज्यांच्या घरात पाण्याची निकासी दक्षिण किंवा पश्चिम दिशेत असते त्यांना आर्थिक समस्येसोबत इतर ही काही त्रासांचा सामना करावा लागतो. उत्तर आणि पूर्व दिशा पाण्याच्या निकासीसाठी आर्थिक दृष्टीने शुभ मानण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळ ग्रहाशी निगडित 10 गोष्टी