केवळ 500 रुपये मोजल्यास कोणाच्याही आधार क्रमांकावरील गोपनीय माहिती मिळते, असं वृत्त रचना यांनी दिलं होतं. त्याचबरोबर अधिकचे 300 रुपये दिल्यास आधार कार्ड प्रिंटिंगचे सॉफ्टवेअरही मिळतात, असं या बातमीत म्हटलं होतं. या वृत्तामुळे देशभरात खळबळ माजली होती. त्यानंतर आधार प्राधिकरणाने तातडीने निवेदन प्रसिद्ध करत हा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर यासंदर्भातील बातमीप्रकरणी रचना खैरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.