Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

atishi
, शुक्रवार, 17 मे 2024 (19:04 IST)
दिल्लीचे कॅबिनेट मंत्री आतिशी यांनी आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेतली. या कटामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान आतिशी म्हणाल्या ती मालीवाल खोटे बोलत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. घटनेच्या दिवशी मुख्यमंत्री केजरीवाल तिथे नव्हते. 
 
स्वाती मालीवाल यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमकावले होते. स्वातीने सांगितलेल्या जखमा कुठेच दिसत नाहीत. याउलट स्वातीने घरात उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमकावले. हा सगळा कट भाजपनेच रचल्याचा त्या म्हणाल्या 
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्य समोर आले.
 
आतिशी म्हणाले की, जेव्हापासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले तेव्हापासून भारतीय जनता पक्ष कट रचत आहे. भाजपने पुन्हा एकदा कट रचला आहे. षड्यंत्राचा एक भाग म्हणून, 13 मे रोजी सकाळी भाजपने स्वाती मालीवाल यांना अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पाठवले. या कटांतर्गत अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे आरोप केले जाणार होते. 
 
स्वाती मालीवाल ही या कटाचा भाग होती. स्वाती मालीवाल कोणतीही माहिती न देता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या त्यावेळी मुख्यमंत्री निवास स्थानी नसल्याचे आतीशी म्हणाल्या. त्या मुळेच त्यांनी बिभववर आरोप केला आहे. आज एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्वाती मालीवाल यांचा एक चेहरा समोर आला आहे. त्याचे एक खोटे उघड झाले आहे. ज्यांचा एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे. आज जो व्हिडिओ समोर आला आहे तो त्याच्या विरुद्ध आहे.स्वाती मालीवाल खुर्चीवर बसल्या आहेत. ती सुरक्षा कर्मचाऱ्यांना धमकावत असल्याचे तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकू शकता. स्वाती मालीवाल यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत. असं आतीशी म्हणाल्या. 
 
स्वाती म्हणाल्या, 13 मे रोजी त्या मुख्यमंत्री निवास स्थानी गेल्या होत्या. त्यांनी विभव कुमार यांना फोन केला. पण आत जाऊ शकल्या नाही. नंतर त्यांच्या मोबाईलवर मेसेज केला त्याचे काहीही उत्तर आले नाही. 
नंतर मी आत निवासस्थानी गेले नंतर मी आत गेल्यावर सुरक्षा रक्षकांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले असे सांगितले. नंतर ते म्हणाले साहेब घरात आहे तुंम्ही बसून घ्या. नंतर मी ड्रॉईंग रूम मध्ये थांबले आणि मुख्यमंत्र्यांची वाट बघू लागले. 
 
एवढयात विभव कुमार ड्रॉईंग रूम मध्ये आले आणि त्यांनी आरडाओरड करायला सुरु केले मी पण त्यांना बोलले. त्यांनी मला मारहाण केली. मी ओरडत होते. विभव कुमार ने 7-8 वेळा माझ्या कानशिलात लगावली. माझा शर्ट ओढला. माझी मासिकपाळी सुरु असता त्यांनी मला मारहाण केली नंतर मी चष्मा उचलला आणि 112 नंबर डायल करत पोलिसांना माहिती दिली. 
 
Edited by - Priya Dixit   
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल