इंदूरमध्ये साप हातात धरून बाईकवरून निघालेल्याएका तरुणाला सापाने चावा घेतला. यानंतर तो खाली कोसळून पडला आणि पुन्हा तरुणाला उठता आले नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना महूच्या तेलीखेडा गावात घडली असून, गोशाळा घाटाजवळून हा तरुण साप पकडून आणत होता, त्यादरम्यान त्याला साप चावला. यानंतर तो जागीच पडला आणि पुन्हा उठू शकला नाही. यानंतर तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून समोर आलेले फुटेज संपूर्ण घटनेचे वर्णन करत आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने हातात साप धरला आहे. यादरम्यान तो दुचाकीवरून पडला आणि पुन्हा उठलाच नाही.मनीष असे या तरुणाचे नाव आहे.
मनीषला दोन वेळा साप चावला होता, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे. कोब्रा आणि इतर विषारी साप इंदूरच्या आसपासच्या जंगलात आहेत. बहुधा मनीषला कोब्रासारख्या विषारी सापाने चावा घेतला, त्यामुळे काही मिनिटांतच त्याचा मृत्यू झाला. मनीष साप पकडण्यात एवढा निपुण होता की तो काही मिनिटांतच सर्वात मोठे सापही पकडायचा, त्यामुळे जवळच्या गावकऱ्याला साप दिसला तर ते नेहमी मनीषला बोलवायचे. मनीषच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.