Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ludhiana: शिक्षकाची विद्यार्थ्याला काठीने मारहाण, शिक्षकाला अटक

arrest
, सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (11:11 IST)
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते काही वेगळेच असतात. एक चांगला शिक्षक विद्यार्थ्याला घडवतो असे म्हणतात.पालक देखील आपल्या मुलांना चांगला व्यक्ती बनण्यासाठी शाळेत पाठवतात. मुलगा शाळेत जाऊन काही चांगले शिकेल या विश्वासाने शाळेत पाठवतात.शिक्षक देखील विद्यार्थ्याला चांगले वळण लागण्यासाठी वेळोवेळी रागावतात किंवा शिक्षा देतात. पण शाळेत मुलांवर क्रूरतापूर्ण व्यवहार केल्यावर पालकांनी कुठे जावं. 

असे काहीसे घडले आहे. पंजाबच्या लुधियानातील एका शाळेत एका शिक्षकाने एलकेजीत शिकणाऱ्या मुलाच्या चुकीवर काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने चुकून वर्गातील एका मुलाला पेन्सिल फेकून मारली होती. एवढ्या कारणावरून शिक्षकाने मुलाला जबर मारहाण केली. शिक्षकाने दोन विद्यार्थ्यांना त्या चिमुकल्याला धरून उलटे करण्यास सांगितले आणि चिमुकल्याच्या पायावर काठीने मारहाण केली.

चिमुकला रडत रडत सांगत होताच की अशी चूक पुन्हा करणार नाही. तरीही शिक्षकाने काहीही ऐकली नाही. या घटनेचा व्हिडीओ तिथे असलेल्या इतर मुलांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या शिक्षकाने सलग दोन दिवस या चिमुकल्यावर अत्याचार केले असून पालकांना हे काहीही सांगितल्यावर शाळेतून काढण्याची धमकी देखील दिली. मुलाने घरी काहीही सांगितले नाही. 
 
घरी गेल्यावर मुलाला चालायला त्रास होऊ लागला.आईने विचारणा केल्यावर त्याने रडत रडत घडलेले सर्व सांगितले. मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या शरीरावर जखमा होत्या. मुलाला रुग्णालयात नेले. नंतर पालक शिक्षकाला जाब विचारायला गेले असता त्यांनी मुलाला शाळेतून काढण्याची धमकी दिली आणि पोलिसात देखील तक्रार न करण्यास सांगितले.

दोन दिवस मुलावर केलेल्या अत्याचाराला आई सहन करू शकली नाही आणि ती थेट पोलीस ठाण्यात गेली आणि शिक्षकाची तक्रार केली. पोलिसांनी तातडीनं शाळेत जाऊन शिक्षकाला अटक केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Asian Games 2023: देशाला नेमबाजीत पहिले सुवर्ण मिळाले,त्रिकुटाने विश्वविक्रम मोडून इतिहास रचला