Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विवो नेक्स ड्युअल स्क्रीन संस्करण 10 जीबी रॅम सोबत 11 डिसेंबराला लॉन्च होणार

विवो नेक्स ड्युअल स्क्रीन संस्करण 10 जीबी रॅम सोबत 11 डिसेंबराला लॉन्च होणार
, गुरूवार, 6 डिसेंबर 2018 (00:34 IST)
विवो नेक्स चिनी कंपनी विवोचा प्रिमियम स्मार्टफोन आहे. कंपनीने नुकतीच विवो नेक्सच्या अपग्रेड केलेल्या हँडसेटसाठी टीझर जारी केले होते. असे दिसते की हा फोन लवकरच लॉन्च होणार आहे कारण या संदर्भात माहितीची येणे सुरू झाले आहे. विवोच्या स्मार्टफोनमध्ये 10 जीबी रॅम असणार आहे. दुसरीकडे, एका वेगळ्या अहवालात, विवो नेक्स द्वितीय जनरेशन यंत्रास विवो नेक्स ड्युअल स्क्रीन असे नाव देण्यात आले आहे. चिनी 
मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo पासून आम्हाला या फोनच्या कथित प्रेस रिलीजची झलक मिळाली आहे आणि या महिन्यात फोन लॉन्च करण्यासाठी तयार केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीनतम विवो नेक्स हँडसेटला विवो नेक्स 2 च्या जागी, 'विवो नेक्स ड्युअल स्क्रीन' संस्करण हे नाव दिले गेले आहे. हे देखील कळले आहे की हा फोन 11 डिसेंबर रोजी चीनच्या शंघाईमध्ये यू + फॅशन आर्ट सेंटरमध्ये लॉन्च केले जाणार आहे. या व्यतिरिक्त, विवो नेक्स मॉडेल 10 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह विवोच्या वेबसाइटवर सूचीबद्ध आहे. जर पाहिला तर हा 10 जीबी रॅम असणारा पहिला फोन असेल. या पूर्वी नूबिया आणि शाओमी ब्रॅण्डने 10 जीबी रॅम स्मार्टफोन लॉन्च केले होते. विवोने अधिकृत वेबसाइटवर विवो नेक्सच्या पुढील मॉडेलसाठी नोंदणी घेणे प्रारंभ केले आहे. कंपनीने टीझर्स देखील पोस्ट केले आहे ज्यामुळे फोनमध्ये ड्युअल डिस्प्ले आणि ट्रिपल रीअर कॅमेरा सेटअपची पुष्टी झाली आहे. गेल्या आठवड्यात या फोनचा एक कथित टेंडर देखील लीक झाला होता ज्यामुळे 
फोनमध्ये बेजलफ्री डिस्प्ले आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरची पुष्टी केली गेली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअरटेलचा स्मार्ट रिचार्ज प्लॅन, 23 रुपयांचा रिचार्ज पॅक