Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता चेहरा बघूनच उघडेल व्हॉट्सअॅप, कोणीही पाहू शकणार नाही आपले चॅट

आता चेहरा बघूनच उघडेल व्हॉट्सअॅप, कोणीही पाहू शकणार नाही आपले चॅट
सोशल मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सतत वापरकर्त्यांसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. व्हॉट्सअॅप आता अशा वैशिष्ट्य आणत आहे, ज्यापासून आपण सुरक्षितपणे गप्पागोष्टी करू शकता. या वैशिष्ट्यात चेहरा बघून व्हॉट्सअॅप उघडेल. 
 
डब्ल्यूएबीएटीएन्फोच्या एका अहवालात, व्हॉट्सअॅप त्यांच्या अॅपमध्ये टच आयडी आणि फेस आयडी सर्पोट जोडण्यावर काम करीत आहे. फेस आयडी आणि टच आयडी सुविधा वापरकर्त्याच्या व्हॉट्सअॅप अंतर्गत गोपनीयता सेटिंग्जमध्ये उपलब्ध असेल. व्हॉट्सअॅपच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये, लवकरच टच आयडी नावाचा एक नवीन पर्याय असेल.
 
चेहरा आणि फिंगर प्रिंट मिळणार नाही, तर पासकोड घालावा लागेल: 
जर आपल्याकडे जुना आयफोन असेल, मग आपल्याला एक टच आयडी पर्याय मिळेल. हे वैशिष्ट्य आयओएस8 आणि या वरील आवृत्तीचे समर्थन करेल. आपण आपल्या फोनमध्ये फेस आयडी किंवा आयडी जेव्हां एनेबल करून घ्याल आणि मग जेव्हा आपण व्हॉट्सअॅप उघडाल तेव्हा आपल्याला आपले फिंगरप्रिंट किंवा चेहरा प्रमाणित करण्यास सांगितले जाईल. जर आपला फोन चेहरा किंवा फिंगरप्रिंट ओळखण्यात अयशस्वी झाला, मग आपल्याला 6-अंकी आयफोन पासकोड प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरी बसल्या मतदार ओळखपत्रामधील फोटो बदला...