Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Xiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या याची किंमत वैशिष्ट्ये

Xiaomi Mi 8 Youth चा नवीन व्हेरिएंट झाला लॉन्च, जाणून घ्या याची किंमत वैशिष्ट्ये
नवी दिल्ली , गुरूवार, 15 नोव्हेंबर 2018 (15:00 IST)
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने एमआय 8 युथ 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात केली आहे.
 
चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने Mi 8 Youth 4 जीबी व्हेरिएंटची सुरुवात केली आहे. कंपनीने Xiaomi Mi 8 Liteला चीनमध्ये Mi 8 Youth Editionच्या नावाने लॉन्च केले होते. सप्टेंबरमध्ये एका इव्हेंट दरम्यान कंपनी4GB RAM + 64GB, 6GB RAM + 64GB और 6GB RAM + 128GB) लॉन्च केले होते. आता कंपनीने या हँडसेटचा चौथा व्हेरिएंट देखील लॉन्च केला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन चिनी बाजारात लॉन्च करण्यात आला आहे आणि तो 16 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
 
* Xiaomi Mi 8 Youth ची किंमत - कंपनीने आतापर्यंत एमआय 8 यूथ च्या या नवीन व्हेरिएंटच्या किमतीबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केली नाही आहे. पण मीडिया अहवालानुसार, त्याची किंमत 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत अर्थात 1,999 चिनी युआन (सुमारे 21,200 रुपये)ज्या जवळपास असू शकते.
 
* Xiaomi Mi 8 Youth  वैशिष्ट्ये - कंपनीने या फोनमध्ये 6.26 इंच एलसीडी डिस्प्ले दिला आहे. 
 
या फोनमध्ये क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर देखील दिला आहे. कॅमेराविषयी बोलत असताना त्यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 12 सह 5 मेगापिक्सेल सेंसर दिले गेले आहे. फ्रंटमध्ये 24 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. ब्ल्यूटूथ 5.0 चा असेल. बॅटरी 3350 एमएएचची असेल. स्मार्टफोनमध्ये AI  स्मार्ट बॅटरी तंत्रज्ञान देण्यात आले आहे. यात AI मेकअप ब्युटी फीचर आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग फीचर देखील देण्यात आले आहे. या फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, जीपीएस आणि ब्ल्यूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी पर्याय देखील देण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

iphone वापरु नका, फेसबुक संस्थापक झुकरबर्गचा निर्णय