Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Electricity Price Hike: नव्या वर्षात ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक

electricity
, रविवार, 31 डिसेंबर 2023 (12:12 IST)
Electricity Price Hike:  नव्या वर्षाला ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक लागणार असून विद्युत नियामक आयोगाने महावितरणला अतिरिक्त उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चाचे 375 कोटी ग्राहकांकडून वसूल केले जाण्याची परवानगी दिली असून आता ग्राहकांना इंधन संयोजन शुल्काच्या नावाखाली 10 ते 70 पैशे पर्यंत प्रति युनिट अधिक द्यावे लागण्याची शक्यता. आहे. 

ग्राहकाला हे इंधन शुल्क 10 महिन्या पर्यंत मोजावे लागणार आहे. बीपीएलच्या ग्राहकांना 10 पैसे प्रति युनिट, 1 ते 100 युनिटचा वापर करणाऱ्या ग्राहकांना 25 पैसे प्रति युनिट तर 100 ते 300 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना 45 पैसे प्रति युनिट, तर 300 पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना 65 पैसे प्रति युनिटने इंधन समायोजन शुल्क मोजावे लागणार आहे. 

म्हणजे नवीन वर्षात सुरुवातीलाच ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागणार असून त्यांच्या खिशाला वर्षाच्या सुरुवातीलाच कात्री लागणार.
 
Edited By- Priya DIxit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बंद घरात कुटुंबातील 5 जणांचे सांगाडे सापडले, 'ते' पत्र काय संकेत देतं?