Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रत्नागिरी पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या!

maharashtra police
, बुधवार, 24 मे 2023 (08:33 IST)
रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी नवी मुंबईत बदली; खेड डीवायएसपी काशिद यांची बृहन्मुंबई तर चिपळूण डीवायएसपी बारी नाशिकला बदली

जिल्हा पोलीस दलातील उपविभागिय दर्जाच्या पोलीस 2 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनितकुमार चौधरी यांची बढतीने नवी मुंबई डायल 112 च्या उपविभागीयपदी बदली करण्यात आली आहे. तर 2 उपविभागीय अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या आहेत.
 
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दोन टर्म कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विनितकुमार चौधरी यांना उपविभागीय पोलीस अधिकारीपदावर बढती देण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती नवी मुंबई येथील डायल 112 मध्ये करण्यात आली आहे. खेडचे उपविभागिय पोलीस अधिकारी शशिकिरण बाबासो काशिद यांची बदली बृहन्मुंबईच्या सहायक पोलीस आयुक्त पदावर करण्यात आली आहे. गेले दोन वर्ष ते खेड येथे कार्यरत होते. तर चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांची नाशिक शहर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळूरपीट येथील यशवंत केडगे यांची बदली लांजा उपविभागीय पोलीस अधिकारीपदावर करण्यात आली आहे. तर ठाणे ग्रामीण येथील राजेंद्र मुणगेकर यांची बदली खेड उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या मनोज सावंत, नीलेश नाईक यांना कार्यालय अधीक्षकपदावर बढती देण्यात आली आहे. मनोज सावंत यांना रत्नागिरी येथे कार्यालय अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तर नीलेश नाईक यांना सिंधुदुर्ग येथे कार्यालय अधीक्षक पदावर बढती मिळाली आहे. रत्नागिरीतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार, प्रकाश पांढरबळे यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. आनंदराव पवार यांची बढतीने पालघर येथे तर प्रकाश पांढरबळे यांची रत्नागिरी येथेच नियुक्ती करण्यात आली आहे.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे : सीडीएस-एनडीएसाठी अर्ज प्रक्रिया सुरु