अनेक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले आहे. राज्यातील छत्रपती सम्भाजी नगर, जालना, परभणी, नांदेड हिंगोली, बीड या जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पाऊस, गारपीट वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे चौघांचा मृत्यू झाला.तसेच शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, मका, बाजरी आणि फळबागांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्यात बसला असून या भागात लहान मोठी अशी सुमारे 84 जनावरे दगावली आहे. झाडांची पडझड झाली आहे.पावसामुळे मराठवाड्यातील 200 हुन अधिक गाव बाधित झाले असून शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा गारपिटीचा फटका बसला आहे.
लातूर जिल्ह्यात तीन दिवस पावसाने हजेरी लावली असून अवकाळी पावसामुळे या जिल्ह्यात नऊ जनावरे दगावली आहे. 25 एकर पेक्षा अधिक फळ बागेचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे आकडेवारी प्रशासनाकडे येत असून प्रशासन कडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.