Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिलेशनशिप मधील ग्रीन फ्लॅग या पाच पद्धतीने ओळखा

love
, बुधवार, 6 मार्च 2024 (21:30 IST)
रेड फ्लॅग किंवा ग्रीन फ्लॅग? सोशल मीडियावर हे शब्द खूप प्रचलित आहे. जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर तुम्हाला कधी तुमच्या पार्टनरची चॅटचा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या मित्रांना सांगावे लागले आहे का? जर तुम्हाला तुमची रिलेशनशिप मधील प्रोब्लेम्स मिटवण्यासाठी मित्रांची मदत घ्यावी लागत असेल तर तुम्ही एक रेड फ्लॅग सोबत आहे. 
 
ग्रीन फ्लॅग चा अर्थ आहे की तुमचा पार्टनर तुमच्यासाठी योग्य आहे. आणि तुम्हाला तो योग्य सन्मान देतो. तसेच रेड फ्लॅग चा अर्थ आहे तुम्ही चुकीच्या पार्टनर सोबत रेलशनशिप मध्ये आहात. जो तुम्हाला चांगला ट्रीट करत नाही आहे. कोणत्याही नात्याला समजण्यासाठी वेळ लागत असतो. पण तुम्ही या टिप्सच्या मदतीने आपल्या रिलशनशिपचे ग्रीन फ्लॅग ओळखू शकतात. 
 
रिलेशनशिपचे ग्रीन फ्लॅग काय असतात? 
इमोशन एक्सप्रेस करणे- जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत इमोशन चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकत असाल तर तुमचा पार्टनर ग्रीन फ्लॅग आहे. फिजिकल इंटिमेसी सोबत इमोशनल इंटिमेसी असणे देखील गरजेचे आहे जर तुमचा पार्टनर तुमच्याशी त्याचे इमोशन आणि फीलिंग्स मोकळेपणाने शेयर करत असेल तर तुम्ही एक चांगल्या रिलेशनशिप मध्ये आहात. 
 
माफी मागणे- अनेक वेळेस काही टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये लोक एगोइस्टिक असतात जे रिलेशशिपसाठी एक रेड फ्लॅग आहे. एक चांगली आणि स्ट्रोंग रिलेशनशिप तुम्हाला एकमेकांची माफी मागायला कमीपणा वाटायला नको तसेच तुमचा पार्टनर जर तुमची माफी मागतांना घाबरत किंवा विचार करत नसेल तर तुम्ही ग्रीन फ्लॅग रिलेशनशिप मध्ये आहात . 
 
सुरक्षितता वाटणे- तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला तुमच्या पार्टनरने स्वीकारणे म्हणजे सुरक्षित असणे. तुम्हाला तुमच्या पार्टनरसमोर काही बोलतांना, घालतांना विचार करावा लागत नाही. अनेक रेड फ्लॅग रिलेशनशिप मध्ये लोक आपल्या पार्टनरला ते सांगतील तसे काम करायला लावतात आणि वागायला लावतात जे चुकीचे आहे. 
 
मान देणे- मान देणे याचा अर्थ असा नाही की चांगले बोलणे. तर तुमचा पार्टनर तुमचा कामाचा आणि निर्णयाचा मान ठेवेल. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल किंवा तुमचे काही नियम असतील तर एक चांगला पार्टनर त्याने सांगितलेली गोष्ट तुम्ही करावी म्हणून तुम्हाला कधी फोर्स करणार नाही. 
 
भविष्याबद्द्ल बोलणे- जर तुम्ही चांगल्या ग्रीन फ्लैग रिलेशनशिप मध्ये असाल तर तुमचा पार्टनर भविष्याबद्द्ल तुमच्याशी बोलत असेल तसेच भविष्यातील त्याचे प्लान तो शेयर करत असेल तर तुम्ही चांगल्या रिलेशनशिप मध्ये आहात कारण भविष्यातील प्लान बद्द्ल सहसा कोणी सांगत नाही. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोज ऑफिसला जातांना पर्स मध्ये ठेवा ह्या वस्तू