Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

August Kranti अरुणा आसफ अली : ऑगस्ट क्रांतीची ज्वाला

Aruna asaf ali
August Kranti 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात 'भारत छोडो आंदोलन' म्हणजेच ऑगस्ट क्रांती प्रस्तावित करण्यात आली. गांधीजींनी तरुणांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांतीची घोषणा करण्यात आली.
 
8 ऑगस्ट रोजी जेव्हा महात्मा गांधी ह्याची सुरुवात केली तेव्हा अनेक असे कार्यकर्ता होते ज्यांनी यासाठी आपले महत्वाचे योगदान दिले. ह्यापैकी एक नाव आहे अरुणा आसफ अली.
 
16 जुलै 1909 ला पंजाबमध्ये एक बंगाली ब्राह्मण कुटुंबात अरुणा आसफ अली यांचा जन्म झाला होता. या एक शिक्षिका, राजकीय कार्यकर्ता आणि संपादक होत्या.
 
'भारत छोडो आंदोलन' किंवा 'ऑगस्ट क्रांती' ह्याची सुरुवात करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीने मुंबईचे गोवालिया टॅंक मैदान (ऑगस्ट क्रांती मैदान) येथे तिरंगा फडकवण्याचं ठरवलं होतं. ही माहिती जेव्हा इंग्रेजांना मिळाली तेव्हा त्यांनी भारतीय लोकांच्या ह्या प्रयत्नाला अयशस्वी करण्यासाठी सगळ्या मुख्य कार्यकर्त्यांना कारावासात टाकून दिलं.
 
आता अश्या परिस्थितीत हा प्रश्न उद्भवला कि तिरंगा फडकवण्याचं कार्य आणि ऑगस्ट क्रांतीची सुरुवात होईल की नाही, आणि हे करेल तरी कोण?
 
सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाल्यावर अरुण आसफ अली यांनी अप्रतिम कौशल्य दाखवले आणि 9  ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावर तिरंगा ध्वज फडकावून इंग्रजांना देश सोडण्याचे खुले आव्हान दिले.
 
परिस्तिथी हाताळण्यासाठी इंग्रेजांनी लाठी चार्जे सुरु केलं. क्रांतीची ही ज्वाला कायम राहावी म्हणून अरुणा काही दिवस गुपितपणे राहिल्या आणि राम मनोहर लोहिया ह्यांच्यासोबत काँग्रेसची मासिक पत्रिका 'इन्कलाब' प्रकाशित केली. त्यांनी खूप युवांना प्रेरित केलं. हे सगळे कार्य करताना त्यांना खूप त्रास देखील सहन करावा लागला. त्यांची संपत्ती जप्त करून विकून दिली गेली. 
 
1930, 1932 आणि 1941 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहादरम्यान अरुणाजींना तुरुंगवास भोगावा लागला. जयप्रकाश नारायण, डॉ.राम मनोहर लोहिया, अच्युत पटवर्धन यांसारख्या समाजवाद्यांच्या विचारांचा त्यांच्यावर अधिक प्रभाव होता. या कारणास्तव 1942 च्या 'छोडो भारत आंदोलना'मध्ये अरुणा असफ अली जी यांनी इंग्रजांच्या कैदेत जाण्याऐवजी भूमिगत राहून आपल्या इतर साथीदारांसह आंदोलनाचे नेतृत्व करणे योग्य वाटले. गांधीजींसारख्या नेत्यांच्या अटकेनंतर लगेचच मुंबईत निषेध सभा आयोजित करून परदेशी सरकारला खुले आव्हान देणार्‍या त्या मुख्य महिला होत्या. मग तुरुंगाबाहेर राहू शकणाऱ्या काँग्रेसजनांना गुप्तपणे मार्गदर्शन केले. मुंबई, कोलकाता, दिल्ली इत्यादी ठिकाणी जाऊन हिंडत पोलिसांच्या तावडीतून सुटून लोकांमध्ये नवीन प्रबोधन आणण्याचा प्रयत्न केला. मात्र 1942 ते 1946 या काळात देशभरात सक्रिय राहूनही त्या पोलिसांच्या हाती लागल्या नाही. 1946 मध्ये त्यांच्या नावाविरुद्धचे वॉरंट रद्द झाल्यावर त्या समोर आल्या. सर्व मालमत्ता जप्त करूनही त्या शरण गेल्या नाही.
 
भारताला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्य करायचं ठरवलं आणि 1954 मध्ये त्यांनी 'द नॅशनल फेडरेशन ऑफ वुमन' ह्याची स्थापना केली. 1958 मध्ये  दिल्लीच्या महापौर बनून आपले योगदान दिले.
 
त्यांचे स्वातंत्र्य क्रांतीमध्ये अविस्मरणीय योगदानाबद्दल आज कमीचं लोकं जाणतात. अरुणा आसफ अली आणि ह्यांच्यासार्‍या अनेक निस्वार्थी कार्यकर्ते होऊन गेले ज्यांचे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात अति महत्वाचे योगदान होते. ह्यांच्या साहस आणि निर्भिक कार्याला सन्मान देण्यासाठी त्यांना 1992 मध्ये पद्म विभूषण आणि 1997 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न प्रदान करण्यात आलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Accident due to speeding Mercedes भरधाव मर्सिडीजमुळे भीषण अपघात