Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 26 April 2025
webdunia

येशू ख्रिस्त : जगाचा आरसा

येशू ख्रिस्त
ND
बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे या जगात अंधार नव्हता. मात्र, राक्षस प्रवृत्तीचा अहंकार वाढल्याने अंधार अस्तित्वात आला. या अंधाराच्या मर्यादेला परमेश्वराने बांधून आहे. पृथ्वीला पाण्यातून काढून पाण्याच्या काठावर स्थिरावले आहे व आदमला सर्वप्रथम पृथ्वीचा राजा बनवले.

सैतानाच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन आदमने पाप केले. ते मानव जातीत पसरले व सर्व लोक मृत्युच्या आ‍धीन झाले. तेव्हा परमेश्वराने जलप्रलयाच्या माध्यामातून पापाचा विनाश केला व पुन्हा एकदा नवीन पृथ्वीची निर्मिती केली. त्यासोबत अशी प्रतिज्ञा केली की, यापुढे पृथ्वीवर प्रत्येक ऋतु आपल्या वेळेनुसार येत राहील. जोपर्यंत शेवटची घटका येत नाही, तोपर्यंत मानवाचा विनाश केला जाणार नाही.

परमेश्वराने वेळेनुसार मानवाशी संपर्क राखला. अब्राहमच्या काळात लोक वेदीवर चढून स्वतःला परमेश्वराला अर्पण करत होते. हाच क्रम मूसा नबीच्या काळात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या 1200 वर्षाआधी कायम राहिला होता. येशू ख्रिस्तानेही सामान्याना न्याय मिळावा म्हणून परमेश्वराशी वारंवार संपर्क ठेवला होता. जे लोक अंधारमय, पापमय जीवन जगत होते, त्यांच्या जीवनात किरण बनून आलेल्या येशू ख्रिस्ताच्या माध्यमातून आजही लोक परमेश्वराशी संपर्क साधतात.

येशूने सांगितले:-
* 'मार्ग, सत्य व जीवन मीच आहे,
* मीच जीवनाची भाकरी आहे,
* मीच जीवनाचे पाणी आहे,
* मीच जगाचा किरण आहे,
* मी चांगला चालक आहे,
* मीच प्रथम व अंतिम, अल्फा व ओमेगा आहे,
* मी जो आहे तो आहे'
* मीच जगाचा आरसा आहे.

येशू ख्रिस्ताने जी ज्योत लावली, ती त्यांच्या बारा शिष्यांनी सार्‍या जगात पसरवली. संपूर्ण जगात पसरलेल्या राक्षसी प्रवृत्तींचा अंधार येशूरूपी ज्योतीने दूर सारायचा आहे. अंधारातून कुणी या प्रकाशात येण्याची इच्छा व्यक्त करेल, त्याचेही आयुष्य ज्योतिर्मय होऊन जाईल, असा संदेश या शिष्यांनी जगभरात नेला.

Share this Story:

Follow Webdunia marathi