प्रभू येशूच्या स्वर्गारोहणानंतर संत जॉन जेरूसलेममध्ये मदर मेरीची काळजी घेत होते. पॅलेस्टिमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्याचे कामही सुरू होते. तेथून ते अशियातील कोचक येथे ( सध्याचे तुर्कस्थान) गेले.
तेथे एफेसुस नगराचा पहिला धर्माध्यक्ष (बिशप) म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पण नंतर धर्मप्रसाराची शिक्षा म्हणून त्याला पकडून रोमला पाठविण्यात आले. रोमन सम्राट दोमिशियनने त्याचा अनन्वित छळ केला.
त्यांना उकळत्या तेलाच्या कढईत टाकण्यात आले. पण त्यांना काहीही झाले नाहीत. हे पाहून त्यांना हद्दपार करण्यात आले. नंतर दोमेशियनच्या मृत्यूनंतर ते एफुसुस नगरात परत आले. वयाच्या 97 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.