प्रभू येशू ख्रिस्त यांनी संत पीटर यांना ख्रिश्चन धर्माचा पहिला आणि सर्वोच्च अधिकारी होण्याचे आश्वासन दिले होते. पुनर्जन्मानंतर प्रभू येशू यांनी संत पीटर यांना आपला उत्ताराधिकारी व ख्रिश्चन धर्माचा प्रमुख म्हणून नेमले.
संत पीटर यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला. येशूच्या आज्ञेनुसार ज्यूंचे प्राबल्य असलेल्या समारिया प्रांतात त्यांनी प्रचाराला सुरवात केली. थोड्याच कालावधीत पुष्कळशा ज्यूंना ख्रिश्नन धर्मात आणण्यात ये यशस्वी ठरले.
त्यांचे वाढते वर्चस्व पाहून तत्कालिन ज्यू धार्मिक नेत्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरवात केली. याला कंटाळून ते रोमला निघून गेले. रोमला त्या काळी खूप महत्त्व होते. जगाच्या मध्यावर असलेल्या या स्थळापासून ख्रिश्चन धर्म बांधवांशी संपर्क साधणे सोपे होते.
मात्र, त्यावेळी रोमचा सम्राट नीरो याने त्यांचा खूप छळ केला. अखेरीस व्हॅटिकन पर्वत क्षेत्रात त्यांची प्राणज्योत मालवली. तेथेच नंतर त्यांच्या स्मरणार्थ मोठे चर्च बांधण्यात आले आहे.