Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'टोल'साठी राज ठाकरे रस्त्यावर; 12 ला रास्ता रोको

टोलसाठी राज ठाकरे रस्त्यावर
WD
राज्यात सुरु असलेल्या टोल कर वसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत. टोलवसुली जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत टोलनाके अशाच प्रकारे फोडले जातील, जाळले जातील, असा इशारा करत टोलविरोधात येत्या 12 फेब्रुवारी रोजी राज्यात रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली. राज ठाकरे पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते. सरकारमध्ये हिंमत असेल तर अटक करून दाखवावी, असे आव्हानही राज यांनी दिले.

शिवसेना-भाजप महायुतीने 18 रोजी कोल्हापुरात मोर्चा काढण्याचे ठरवले असताना त्याआधीच ‘रास्ता रोको’चा राजमार्ग पुकारत राज यांनी महायुतीवर कुरघोडी केली. या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व स्वत: राज करणार आहे.

'मी निवडणूक प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आलो नाही. त्याच नारळाने सरकारचे टाळके फोडण्यासाठी आलो आहे' या वाक्याने राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. रस्त्यांसाठी 13 प्रकारचे कर भरले जातात. माझ्या सहकार्‍यांनी टोल नाक्यांवर वाहनांची मोजणी केली. तेव्हा हा सगळा प्रकार ‍आढळून आला. कराच्या नावा खाली. 2000 ते 2011 या काळात 22 हजार 266 कोटी रुपये मिळाले. बाकीचा टॅक्स कुठे गेला. टोलबाबत लवकरच मोबाइल अँप्स व फेसबुकद्वारे जनतेला खरी माहिती देऊ, असेही राज यांनी स्पष्‍ट केले.

टोलप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटलो. उपयोगच नाही. राज्याचे मुख्यमंत्री बिनपगडीचे मनमोहनसिंगच आहेत, अशी टीकाही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली. टोलच्या मुद्दय़ावरून मी सरकारविरोधात आंदोलन करतोय तर माझ्यावर टीका कोण करते आहे तर शिवसेना. मला समजतच नाही ते विरोधी पक्ष आहेत की सरकारमध्ये?

Share this Story:

Follow Webdunia marathi