Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देव एकच आहे हे सांगणारा मुस्लिम धर्म

देव एकच आहे हे सांगणारा मुस्लिम धर्म
सौदी अरेबियातील मक्का येथे चौदाशे वर्षापूर्वी इस्लाम धर्माची स्थापना झाली. या धर्माचे अनुयायी देवाला अल्ला असे म्हणतात व मशिदीत जाऊन नमाज (प्रार्थनेची पद्धत) पढतात. मोहम्मद पैगंबर यांनी या धर्माची स्थापना केली.

त्यांना प्रेषित मानले जाते. त्यांना थेट परमेश्वराकडून (अल्ला) संदेश मिळाले. या संदेशाचेच पुढे पैगंबरांच्या मृत्यूनंतर एकत्रीकरण होऊन कुराण हा पवित्र धर्मग्रंथ तयार झाला.


जगात ख्रिश्चन धर्मानंतर सर्वांत जास्त अनुयायी मुस्लिम धर्माचे आहेत. जगभरात त्यांची संख्या एकशे चाळीस कोटींहून अधिक आहे. त्यांना मुसलमान असे म्हणतात.

मुस्लिम या शब्दाचे दोन अर्थ आहेत- शांती व शरण जाणे. जगभरात मुसलमानांचे शिया व सुन्नी या दोन प्रमुख पंथांखेरीज इतरही काही पंथ आहेत, मात्र, ते सर्व एकाच तत्वज्ञानाला मानतात, ते म्हणजे 'देव एकच आहे'.


मुस्लिम धर्म असे मानतो की, अल्लानेच लोकांना जीवनात कसे जगावे याची शिकवण देण्यासाठी प्रेषितांना पृथ्वीवर पाठविले. येशू, मूसा व अब्राहम ही त्याचीच रूपे आहेत. पैगंबर हा त्यांच्यातला शेवटचा प्रेषित. रमजान ईद हा या धर्मातील सर्वांत मोठा सण आहे.

वैशिष्ट्ये मुस्लिम धर्माची

1. ईश्वर एकच आहे. मुस्लिम धर्माच्या अनुयायाने दुसऱया कुठल्या देवाची पूजा करणे अमान्य. ईश्वर कसा आहे हे कुणालाच माहित नाही. त्यामुळे या धर्मात देवाला सगुण स्वरूपात पूजले जात नाही.

2. रसालत - देवाच्या दूताने (प्रेषित) जे काही सांगितले आहे, त्याप्रमाणे वागणे. कुराण या पवित्र धर्मग्रंथाला मानणे.

3. भाग्याला मानणे.

4. नमाज पढणे ः प्रत्येक मुस्लिमाने दिवसातून किमान पाच वेळा तरी नमाज पढायला पाहिजे.

5. रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास करणे.

6. दानधर्म (जकात) करणे.

7. आयुष्यात एकदा तरी मक्केला जाणे.

Share this Story:

Follow Webdunia marathi