Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दु:खाचा दिवस 'मोहरम'

याकूब सईद

दु:खाचा दिवस 'मोहरम'

वेबदुनिया

इराकची राजधानी बगदादपासून 1 किमी अंतरावर उत्तर पूर्व दिशेला करबला हे एक छोटेसे गाव आहे. येथे तारीख-ए-इस्लामचे एक ऐतिहासिक युद्ध झाले. त्याने इस्लाम धर्माचा चेहरामोहराच बदलून टाकला. या करबला गावामुळे जगातील प्रत्येक शहरात 'करबला' नावाचे पवित्र स्थान उभारण्यात आले आहे व या ठिकाणी मोहरम साजरा केला जातो. 

हिजरी संवत या पहिल्या महिन्यात मोहरमची 1 तारखेला (1 मुहर्रम 61 हिजरी, अर्थात 1 ऑक्टोबर 68) मोहम्मद साहेब यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे खलिफा यजीद बिन मुआविया या साथीदाराने या दिवशी मारून टाकले होते, तो दिवस म्हणजे 'यौमे आशुरा' होय. याच दिवशी दुखाचा दिवस म्हणून मुस्लिम बांधव मोहरम साजरा करतात.

असे सांगितले जाते की, करबलामध्ये एका बाजूला केवळ 72 तर दुसर्‍या बाजूला यजिद यांचे तब्बल 4 हजार सैनिक होते. 72 जणांमध्ये महिला-पुरुष व 51 मुलांचा समावेश होता. हजरत हुसैन यांच्या या फौजेत अनेक लहान मुले होती. अशा परिस्थितीत ही ते युद्धास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यां या सैन्याचे प्रमुख होते. दुसर्‍या बाजूला यजिद यां या सैन्याची कमान उमर इब्ने सअद यांच्या हातात होती.

युद्धाचे कारण इस्लाम धर्माचे पाचवे खलिदा अमीर मु‍आविया यांनी खलिदा या निवडणुकीत समा यांच्या विरोधात जाऊन त्यांचा मुलगा यजिदला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. यजीद हा त्या काळी गुंड म्हणून प्रसिद्ध होता. समाजात त्याची प्रतिमा डागळलेली होती. त्यामुळे त्याकाळात या मुस्लिम समाजबांधवांना यजीद खलिफा झाल्याचे रुचले नाही.

यजिदने समाजाविरुद्ध बंड करून इतर नागरिकांसोबत त्याने हजरत हुसैन यांनी त्याला खलिदा पदासाठी मान्य करण्यासाठी दम दिला. इमाम हुसैन यांनी यजीदला खलिदा म्हणून मान्य न केल्याने करबला या गावावर युद्धाचे ढग गोळा झाले. त्यानंतर युद्ध झाल्याने हुसैन शहीद झाले. त्यामुळेच हजरत हुसैन यांना 'शहीद-ए-आजम' म्हटले जाते.

हजरत हुसैन यांनी मुठभर नागरिकांच्या मदतीने त्या काळात या जाचक हुकूमशाहीविरुद्ध कंबर कसली होती. हुसैन यांनी केलेले महान कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. हजरत हुसैन यांच्या या स्मरणार्थ मोहरम साजरा केला जातो. तसे पाहिले तर हा काही उत्सव नसून दुखाचा दिवस आहे. हजरत हुसैन यांचे आंदोलन असा संदेश देते की, प्रत्येक नागरिकाने सत्याच्या मार्गाने गेले पाहिजे. युद्धानंतरच शिया व सुन्नी अशा दोन वर्गात मुस्लिम धर्माचे विभाजन झाले. हळूहळू शिया वर्गातच मोहरमचे महत्त्व अबाधित राहिले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Raksha Bandhan 2021 : रक्षाबंधनाला 'गज केसरी योग' तयार होत आहे, या राशींचे भाग्य बदलेल, पाहा तुम्हालाही नशिबाचा साथ मिळेल का