भगवान महावीर म्हणतात, की जाणते किवा अजाणतेपणातून कुणाची हिंसा करणे योग्य नाही. याशिवाय दूसर्यांच्या मार्फतही कुणाची हिंसा घडवून आणू नये. कुठल्याही जीवांना मन, शरीर किवा बोलण्याने दंडीत करू नका. सर्वांच्या आत एकच आत्मा आहे.
आपल्याप्रमाणेच प्रत्येकाला आपापले प्राण प्रिय आहेत. तशा प्रकारची विचासरणी आचरणात आणल्यावर भय व द्वेषापासून मुक्ती मिळवून कोणत्याही प्राण्याप्रती हिंसा करू नये.
स्वतः हिंसा करणारा, दूसर्याकडून हिंसा घडवून आणणारा व दुसर्याने केलेल्या हिंसेचे समर्थन करणारा स्वतः प्रति द्वेष वाढवित असतो. कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे हीच ज्ञानाची खरी परिभाषा आहे.
अहिंसेविषयी एवढे ज्ञान असले तरी भरपूर आहे. हेच अहिंसेचे विज्ञान आहे. प्रत्येक जीव किवा प्राण्यास आपला जीव प्रिय असतो. दुःखापेक्षा सुख हवेहवेसे वाटते. जगण्यातील आनंद सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो.
म्हणूनच कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका. आपल्या आत्म्याप्रती असणारा भाव इतर प्राण्यांविषयीही असू द्या. सर्व प्राणीमात्रांविषयी अहिंसेचा भाव राखावा. मन, वाणी व शरीराने कुणाचीही हिंसा न करणारा खरा संयमी व्यक्ती म्हणून गणला जातो.
चालताना, बोलताना, बसताना किंवा जेवण करताना असावध असणारा, स्वतःची पूर्ण खात्री झाल्याशिवाय, पाहिल्या व विचार केल्याशिवाय क्रिया व कृती करणारा हिंसा करत असतो.
असा व्यक्ती कर्मबंधनात अडकत असतो. दुःखास सर्वच जीव घाबरतात, हे लक्षात ठेऊन कोणत्याही जीवास कष्ट पोहचविणे टाळावे.