Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mahavir Jayanti 2024 : कधी आहे महावीर जयंती

mahavir jayanti
, रविवार, 21 एप्रिल 2024 (08:55 IST)
2024 Mahavir Jayanti : भगवान महावीर यांची जयंती हे जैन धर्मियांचे प्रमुख पर्व आहे. याला महावीर जन्म कल्याणकच्या नावाने ओळखले जाते. हे पर्व जैन धर्माच्या 24 वे तीर्थंकर महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणकचे उपलक्ष्य मानले जाते. 
 
भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी साजरा होतो. जैन समाज द्वारा पूर्ण जगामध्ये भगवान महावीरांचा जन्म उत्सवच्या रूपात 'महावीर जयंती' म्हणून साजरा केला जातो. चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल त्रयोदशीला दिगंबर आणि श्वेतांबर जैन एकत्र येऊन हा सण मोठया उत्साहात साजरा करतात. 
 
जैन कॅलेंडर अनुसार वर्ष 2024 मध्ये भगवान महावीर स्वामी यांची जयंती 21 एप्रिल, रविवार साजरी होईल. महावीर स्वामी यांचा जन्म चैत्र शुक्लची त्रयोदशी तिथिच्या दिवशी कुंडलपुर मध्ये झाला होता. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचे जन्म नाव 'वर्धमान' होते. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला/ प्रियंकारिनी होते. 
 
ईसा से 599 वर्ष पहिले वैशाली गणतंत्रच्या क्षत्रिय कुंडलपुरमध्ये पिता सिद्धार्थ आणि माता त्रिशलाच्या घरी तिसऱ्या संतांच्या रूपात चैत्र शुक्ल त्रयोदशीला वर्धमान यांनी जन्म घेतला होता. तेच वर्धमान पुढे जाऊन महावीर स्वामी बनले. बिहारचे मुजफ्फरपुर जिल्ह्याचे आजचे नाव बसाढगांव आहे. तेव्हा ते वैशाली नावाने ओळखले जायचे. 
 
महावीर स्वामी जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर आणि अहिंसाचे मूर्तिमान प्रतीक होते. त्यांचे जीवन त्याग आणि तपस्या याने ओतप्रोत होते. ज्या युगामध्ये हिंसा, पशु बलि, जाति-पाति मध्ये भेदभाव वाढले होते, त्यावेळेस भगवान महावीरांनी जन्म घेतला होता. जगाला त्यांनी सत्य, अहिंसाचे उपदेश दिलेत. 
 
महावीर स्वामी यांनी  मार्गशीर्ष कृष्ण दशमीला दीक्षा ग्रहण केली आणि वैशाख शुक्ल दशमीला महावीर स्वामी यांना कैवल्य ज्ञानाची प्राप्ती झाली. तसेच कार्तिक कृष्ण अमावस्याच्या दिवशी 72 वर्षाचे असतांना पावापुरी मध्ये निर्वाण प्राप्त झाले.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !