Adhik Maas 2023 अधिकमासात करावयाची व्रते व नियम
अधिक महिन्यात पहाटे लवकर उठून अंगाला सुगंधी उटी लावून स्नान करावे. नदीवर अथवा तीर्थाच्या ठिकाणी स्नानादी धार्मिक कृत्ये केल्यास अजूनच योग्य ठरेल. या महिन्यात मन निर्मळ ठेवावे. तसेच या मासात आवळच्या झाडाखालील स्नानाला विशेष महत्व आहे.
या महिन्यात स्नान करताना हे मंत्र म्हणावे
गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणम् ।
गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियम् ॥
भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्रविवर्धिनी ।
अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम् ॥
या महिन्यात एकभुक्त राहावे तसेच जेवताना मौन पाळावे.
अधिक महिन्यात रोज देवाजवळ दिवा लावावा. महिन्याच्या शेवटी तो ब्राह्मणाला दान द्यावा.
या महिन्यात आपल्याला आवडणार्या एखाद्या पदार्थाचा किंवा वस्तूचा त्याग करावा.
या महिन्यातील दानाचे खूप महत्व आहे.
हिंदू धर्मात मुलगी आणि जावयाला लक्ष्मी- नारायणाचा जोडा मानतात. म्हणून या महिन्यात जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देण्याची प्रथा आहे. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. आपण बत्तासे, म्हैसूरपाक किंवा इतर कोणतेही जाळीदार गोड पदार्थ देऊ शकता.
या महिन्यात नारळ, सुपार्या, फळे यासारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात.
या प्रकारे करावे दान
अपूपदान संकल्प -
ममत्रयस्त्रिंशद्देवतात्मकविष्णुरूपी सहस्त्रांशु श्रीपुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिलपापप्रशमपूर्वं पुत्रपौत्रयुत धनधान्यक्षेमसमृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फलप्राप्त्यापूपच्छिद्रसमसंख्यवर्षसहस्त्रवधी स्वर्लोकनिवासादिकल्पोक्तफलसिद्ध्यर्थं मलमासप्रयुक्तं अपूपदानं करिष्ये ।
या प्रमाणे संकल्प करून दान वस्तूचे पूजन करावे. नंतर ब्राह्मणाचे पूजन करून पुढील श्लोकांनी त्यांची प्रार्थना करावी,
विष्णुरुपी सहस्त्रांशु: सर्वपापप्रणाशन: ।
अपूपान्न प्रदानेन मम पापं व्यपोहतु ॥
नारायण जगद्वीज भास्कर प्रतिरूपक ।
व्रतेनानेन पुत्रांश्च संपदं चापि वर्धय ॥
यस्य हस्ते गदाचक्रे गरुडो यस्य वाहनं ।
शंख: करतले यस्य स मे विष्णु: प्रसीदतु ॥
कलाकाष्ठादिरूपेण निमेषघटिकादिना ।
यो वंचयति भूतानि तस्मै कालात्मने नम: ॥
कुरुक्षेत्रमयं देश: काल: पर्वद्विजो हरि: ।
पृथ्वीसममिमं दानं गृहाण पुरुषोत्तम ॥
मलानांच विशुद्ध्द्यर्ह्तं तव दास्यामि भास्कर ।
इदं सोपस्करं त्रयस्त्रिंशदपूपदानं सदक्षिणाकं सतांबूलं
या महिन्यात पुरणाचे दिंड करून इष्ट मित्रांना, नातेवाईकांना भोजन देतात.
या महिन्यात रोज गायीला पूरण पोळीचा घास द्यावा.
महिनाभर सतत नामस्मरण करावे. कुलदैवताचे नामस्मरण तसेच श्री विष्णूंचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ.
शुद्ध मनाने अधिक महिन्याची पोथी रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचावी. शेवटी उद्यापन करावं त्यावेळी ब्राह्मणाला दान द्यावं. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. अशाने भगवान पुरुषोत्तम श्री नारायण प्रसन्न होतात आणि भक्तांचे कल्याण करतात.
अधिक मासात केलेल्या पूजेचे तीर्थयात्रेचे फळ अनेक पटींनी मिळते.
या महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्यप्राप्ती होते.
या महिन्यात निदान एक दिवस तरी गंगास्नान केल्यास सर्वपापापासून मुक्ती मिळते.