या महिन्याला अधिक मास, मलमास इत्यादी नावाने देखील संबोधले जाते. या काळात सर्व शुभ कामे प्रतिबंधित असतात. ज्याने भौतिक आनंद प्राप्ती होते ते सर्व कामे या महिन्यात निषिद्ध असल्याचे सांगितले गेले आहे.
उदाहरणार्थ : साखरपुडा किंवा साक्षगंध, लग्न, जावळ, घर बांधणी, गृह प्रवेश, काही कामासाठी जमीन, वाहने, दागिने विकत घेणं, सन्यास किंवा शिष्य दीक्षा घेणं, नववधूचे गृहप्रवेश, देवी-देवांची प्राणप्रतिष्ठा करणं, यज्ञ, मोठी पूजा करणं, श्राद्ध करणं, विहीर, बोअरवेल, जलाशय खणू नये.
या महिन्यात खास करून एखाद्या आजारा पासून मुक्तीसाठी केले जाणारे अनुष्ठान, कर्जाची परतफेड, शस्त्रक्रिया, अपत्य जन्माशी निगडित कामे, सूर्यपूजा इत्यादी गर्भसंस्कार केले जाऊ शकतात.
या महिन्यात प्रवास करणं, भागीदारीची कामे करणं, हक्क मागणे, बी पेरणे, झाडं लावणं, देणगी देणं, लोककल्याणकारी काम, सेवाकार्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे दोष नसतो. या महिन्यात उपवास, देणगी देणं, जप केल्याने निश्चितच फलप्राप्ती होते.