Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिध्दटेकचा सि‍ध्दिविनायक

सिध्दटेकचा सि‍ध्दिविनायक
अष्टविनायकामधील दुसरा गणपती सिध्दटेकचा सि‍ध्दिविनायक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे की त्याची सोंड उजव्या बाजूस आहे. मधु व कैटभ या असूरांशी भगवान विष्णु अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करन विष्णूने असूरांचा वध केला.   

छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. 15 फूट उंचीचे व 10 फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. 3 फूट उंच व 2.5 फूट लांबीची ही मूर्ती स्वयंभू आहे.

त्याच्या एका मांडीवर रिध्दी व सिध्द बसल्या आहे‍त. उत्तराभिमुखी असलेली या मूर्तीची सोंड उजवीकडे असल्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे 5 किलोमीटर फिरावे लागते.

हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास 21 प्रदक्षिणा घातल्या. त्यांतर 21 दिवसांनी त्यांची सरदारकी परत मिळाल्याची अख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.

जाण्याचा मार्ग :

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिध्दटेक येथे हे मंदिर आहे. पुण्यापासून अंदाजे 99 किलोमीटरवर देऊळ आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संक्रांती विशेष : चविष्ट आणि चमचमीत बंगाली खिचडी