Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवीन वर्ष हे खरेच आहे की एक संभ्रम आहे ? जाणून घ्या

webdunia
मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (09:59 IST)
प्रत्येक देशाचे आपले नवीन वर्ष आहे. भारतात काही प्रांत असे आहे ज्यांचे नवे वर्ष प्रचलित नवे वर्षापेक्षा वेगळे असतात. नवे वर्ष म्हणजे नवी दिनदर्शिका म्हणजेच नवे विक्रम संवत, इंग्रजी इ. संवत, हिजरी संवत, शक संवत, वीर निर्वाण संवत, पारशी संवत, बौद्ध संवत, शीख संवत, यहुदी संवत, इत्यादी. अशा प्रकारे संपूर्ण जगात सुमारे 100 पेक्षा जास्त दिनदर्शिका किंवा कॅलेंडर प्रचलित आहे. म्हणजे 100 पेक्षा जास्त नवीन वर्ष आहे. विचार करा की काय हे सर्व नवीन वर्ष विज्ञानाशी सम्मत आहे का ? अशा परिस्थितीत आपण कोणते नवीन वर्ष मान्य करावे? सध्याच्या काळात जगभरात तर इंग्रजी इ. संवत जास्त प्रख्यात आहे. तर लोक या अनुषंघाने 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात मानतात पण हे विज्ञानाच्या दृष्टीने सम्मत आहे का ? अशा परिस्थितीत हे अंदाज लावणे की पुढील वर्ष कसे आहे किंवा पुढील वर्षाची भविष्यवाणी करणे किती योग्य आहे? 
 
1 वर्षाच्या सुरुवातीचे महिने - जगभरातील वेगवेगळ्या समाजात, धर्मात आणि देशात वेगवेगळ्या वेळेत नवीन वर्ष साजरे केले जाते. जगभरात जेवढे कॅलेंडर सध्या चलनात आहे, त्या पैकी बहुतेक नवीन वर्षाची सुरुवात फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान सुरु होते. भारतातील बऱ्याच कॅलेंडर मध्ये नवीन वर्ष मार्च ते एप्रिल च्या दरम्यान होते आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात सूर्योदयापासून होते. रोमचे हुकूमशहा ज्युलिअस सीझर ने इ.स.पू. 45 व्या वर्षी जेव्हा ज्युलियन कॅलेंडर ची स्थापना केली, त्या वेळी जगभरात पहिल्यांदा 1 जानेवारी ला नवीन वर्षाचे प्रथम दिवस म्हणून घोषित केले.
 
2 वेळ चक्र - भारतात प्रचलित विक्रम संवतच्यानुसार सूर्योदयापासून दिवस सुरु होतो. सूर्यास्ता नंतर त्या दिवसाची रात्र सुरु होते.त्या रात्रीचे शेवट चे प्रहर झाल्यावर  जेव्हा नवीन सूर्योदय होतो तेव्हा दिवस आणि रात्रीचे चक्र पूर्ण होतात. म्हणजे सूर्योदय पासून ते दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदया पर्यंत एक दिवस पूर्ण मानतात. तर इंग्रजी किंवा ग्रेगोरियन कॅलेंडरच्यानुसार रात्री 12 वाजेपासून नवीन दिवसाची सुरुवात होते जे कोणत्याही अर्थाने विज्ञान सम्मत मानले जात नाही या सत्याला स्वीकारले पाहिजे की रात्री दिवस बदलत नाही आणि जानेवारीत नवीन वर्ष सुरु होत नाही. असा विश्वास आहे की हे वर्ष नवीन आहे तर या वर आपण विश्वास ठेवा आणि त्याच प्रमाणे शुभ किंवा अशुभ ठरवा, पण सत्याला जाणून घेणे आवश्यक आहे.
 
3 विज्ञान सम्मत कॅलेंडर कोणते आहे - जर एखादे कॅलेंडर आपली मान्यता, विश्वास, धार्मिक घटना, संदेश वाहकाच्या जन्म, जयंतीवर आधारित असतात तर ते कॅलेंडर देखील एक कॅलेंडरच असतात तर त्याचे संबंध विज्ञानाशी नसून इतिहासाशी आहे. तथापि विज्ञानानुसार जेव्हा पृथ्वी आपले एक चक्र पूर्ण करते तेव्हापासून नवीन वर्ष सुरु होतो. वैज्ञानिक असे मानतात की मार्च मध्ये बदलणारे कॅलेन्डरलाच निसर्ग आणि विज्ञान सम्मत मानले आहे त्या मागील बरीच कारणे आहे. मार्च महिन्यात निसर्गाचे आणि पृथ्वीचे एक चक्र पूर्ण होतात. दुसरे असे की जानेवारी मध्ये निसर्गाचे चक्र पूर्ण होत नाही. पृथ्वी आपल्या अक्षावर आणि सूर्याच्या भोवती फिरल्यावर जेव्हा दुसरे चक्र सुरु होतात तेच नवीन वर्ष आहे. नवीन वर्षात नव्याने निसर्गाच्या जीवनाची सुरुवात होते. वसंत बहरतो. पुरातन काळाचे सर्व कॅलेंडर मार्च पासून सुरु होत होते पण राजांनी आपापल्या पद्धतीने कॅलेन्डरला विकसित केले.
 
पृथ्वीचे दोन वेग आहे : फिरण्याची वेळ किंवा घूर्णन आणि फिरणे किंवा परिक्रमण. पृथ्वी आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वीकडे फिरते ज्याला पृथ्वीचे फिरणे म्हणजे दैनंदिन गती म्हणतात. एक फेरी पूर्ण करण्यात पृथ्वी 23 तास, 56 मिनिट आणि 4.09 सेकंदाचा वेळ घेते. या दैनंदिनी गतिमुळे दिवस रात्र होतात.
 
अशा प्रकारे पृथ्वी आपल्या अक्षावर फिरण्यासह सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा लावते. ज्याला वार्षिक गती असे म्हणतात. पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा 365 दिवसात 6 तास 48 मिनिट आणि 45.51 सेकंदात पूर्ण करते. या प्रदक्षिणा किंवा वार्षिक गती मुळे हवामानात बदल दिसतात. पृथ्वीचे अक्ष त्याच्या कक्षे  पासून 66 .5 अंशा पर्यंत वाकलेली आहे. पृथ्वीच्या ह्या  वाकलेल्या  किंवा झूकलेल्या अक्ष आणि प्रदक्षिणा च्या हालचालीमुळे वसंत,उन्हाळा,हिवाळा आणि पावसाळा ऋतू येतात. वसंत ही पहिली ऋतू मानली जाते.
 
कोणत्याही धर्माचा कोणता ही दिवस  मोठा नसतो तर 21 जून हा मोठा दिवस आहे. खरं तर या दिवशी सूर्य पृथ्वीच्या उत्तरी ध्रुवावर असतो त्यामुळे सूर्याचा प्रकाश भारताच्या मधून जाणाऱ्या कर्क रेषेवर थेट पडतो आणि याच कारणामुळे सूर्याचे  किरण इतर दिवसापेक्षा जास्त काळ पृथ्वी वर असतात. म्हणून या दिवसाला वर्षाचा सर्वात मोठा दिवस आणि रात्र लहान असते. ही खगोलीय घटना भारतात प्रत्येक वर्षी 21 जून रोजी घडते. 
 
असे म्हणतात की 21 मार्च रोजी पृथ्वी आपले एक चक्र पूर्ण करते 21 मार्च आणि 23 सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्र समान असतात आणि 21 ते 23 डिसेंबर पासून दिवस लहान आणि रात्र मोठी होऊ लागते.म्हणून या दिवसाला विंटर सॉल्स्टिस च्या रूपात साजरे करतात. 20 ते 23 जून च्या दरम्यान समर सॉल्स्टिस म्हणजे ग्रीष्म किंवा उन्हाळी संक्रांत म्हणून साजरे करतात. भारतात समर सॉल्स्टिस ची सुरुवात 21 जून पासून सुरु होते पण उत्तरी ध्रुवाचा इतर देशांमध्ये हे 21,22,23 जून रोजी देखील होऊ शकतो. 21 जून पासून पृथ्वीच्या उत्तरी ध्रुवामध्ये एकी कडे उन्हाळा सुरु होतो ते दक्षिणी ध्रुव मध्ये याच्या उलट रात्र मोठी  होऊ लागते आणि इथे राहणाऱ्या लोकांसाठी हिवाळ्याची सुरुवात होते. दक्षिणी ध्रुवावर राहणाऱ्या लोकांसाठी रात्र मोठी आणि दिवस लहान होतात.
 
इंग्रजी कॅलेंडर - या इंग्रजी कॅलेंडरची सुरुवात रोमच्या प्राचीन दिनदर्शिकेपासून सुरु झाली आहे. सुरुवातीच्या काळात रोमन कॅलेंडरात सुरुवातीचे 10 महिनेच असायचे  आणि वर्षाची सुरुवात 1 मार्च पासून असायची बऱ्याच दिवसानंतर 713 इ स पूर्वी या मध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी महिने जोडले गेले. सर्वात पहिले 153 इ स पूर्वी 1 जानेवारीला वर्षाची सुरुवात मानली आहे. आणि 45 इ स पूर्वी जेव्हा रोमचे हुकूमशहा ज्युलिअस सीझर ने ज्युलियन दिनदर्शिकेचे शुभारंभ केले, तर हे तसेच कायम ठेवले. असं करण्यासाठी ज्युलिअस सीझर ला मागील वर्ष म्हणजे इ स पूर्व 46 इ ला 445 दिवसाचे करावे लागले.
 
1 जानेवारी ला नवीन वर्ष मानण्याचे चलन 1582 इ स च्या ग्रेगोरियन कॅलेंडर च्या आरंभा नंतर झाले.जगभरात प्रचलित असलेले ग्रेगोरियन कॅलेंडरला पॉप ग्रेगरी आठवे यांनी या मध्ये लीप वर्ष देखील दिले. ब्रिटिश साम्राज्याने जवळजवळ सर्वत्र राज्य केले, म्हणून जगभरात या कॅलेंडरचे प्रचलन सुरु झाले.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

स्वप्न शास्त्रात या स्वप्नांना अशुभ मानतात, जाणून घ्या परिणाम