मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)
या महिन्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू बळकट राहील. नव्या खरेदीसाठी ही वेळ अनुकूल आहे. नवे लाभदायक संबंध प्रस्थापित होतील. धार्मिक कार्यात रूची वाढेल. वैवाहिक जीवन कडू-गोड राहील. विध्यार्थी वर्गाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे. कंपनीशी निगडित कार्यांसाठी तुम्हाला विदेश यात्रा करण्याचा योग आहे. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. वडिलांचे आरोग्य तुमचे काळजीचे कारण बनू शकतं. वर्तमान काळात बायकोच्या नावावर केलेली गुंतवणुकीमुळे तुम्हाला लाभ मिळणार आहे.
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
या महिन्यात धनप्राप्तीचे आकस्मिक योग जुळून येत आहेत. जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल तर या महिन्यात ते फ़ेडून टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जी कामं केवळ डोक्यातच कल्पनेच्या स्वरूपात होती ती आता वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. ही आपल्या यशोगाथेतील एक मोठी झेप ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे. जे लोक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत आहे, त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम नसल्याने त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेला प्रभावित करू शकते.
मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)
प्रेमासाठी अनुकूल वेळ आहे. महिना अखेरीस चांगली बातमी कळू शकेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. विदेशातही जाऊ शकता. काहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या अपत्याला तुमचा वेळ हवा आहे, हे ध्यानात असू द्या. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरदार कामात व्यस्त राहतील. स्त्री पक्षाचा आधार राहील. व्यवसायात भागीदार किंवा खास मित्राची मदत मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांमुळे तुम्हाला विदेश यात्रा घडू शकते. ज्या लोकांना विवाह करायचा असेल त्यांच्यासाठी हा काळ फारच उत्तम ठरणार आहे.
कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
वाहन आणि मालमत्तेची खरेदी वगैरे तुमच्यासाठी फारच फ़ायदेशीर ठरेल. अर्धवट आणि अडलेल्या कामांना गती येईल. आरोग्याप्रती बेपर्वाई तुम्हाला महागात पडू शकते. धर्माप्रती आवड वाढेल. मित्रांची मदत मिळेल. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. शत्रूंपासून सावध राहा. कृषी, जमीन, घर, सोने चांदी, फर्निचर,कपडे, कागद, मशीनरी, हॉटेल आणि रेस्टोरेंट इत्यादी व्यवसायाशी निगडित लोकांना या महिन्यात भरपूर धन लाभ होणार आहे.
सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)
जीवनात नवा रंग भरण्याची वेळ आली आहे. जुन्या गोष्टी विसरून मार्गक्रमण करा. वातावरणाचा आनंद लुटा. शैक्षणिक कार्यात खर्च होईल. जोडीदाराचे वागणे तुमच्यासाठी साहाय्यकारी सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्मसंयमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.
कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो)
वैवाहिक जीवन तुमचे सहकार्य आणि वेळ मागत आहे. मित्रासोबत नवा व्यवसाय सुरू केल्यास कालांतराने लाभ होईल. वेळेचे महत्त्व ओळखा. तुम्ही जरा व्यावहारिक झाले पाहिजे, अति भावनिकता तुमचे नुकसान करू शकेल. वडिलांचे स्वास्थ्य तुम्हाला काळजीत पाडेल. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील.
तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते)
संघर्षानेच यशप्राप्ती होईल. अचानक कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका. तुमच्या या घाईगडबडीचा फायदा तुमचे विरोधक घेऊ शकतील. शांत राहून चांगले कर्म करत राहा. मांसाहार आणि मद्यसेवन टाळणे ठीक होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवडयात परिस्थिती बदलायचा सुरूवात होईल. वर्षाचा शेवट सकारात्मकतेने होईल. या महिन्यात व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. दृष्टिकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल.
वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
काम वेळेत पूर्ण होतील. योजना पूर्ण होतील. 15 तारखेनंतर कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करा. ब्येत उत्तम राहील. बॉस तुमच्या कामावर युश होईल. सहकर्मचारी सहाय्य करतील. कलाक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. स्वास्थ चांगले राहिल. नवे घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कर वगैरे सारख्या कायदेशीर बावींपासून सुटका मिळू शकते. आडत्यांसाठी वेळ चांगली आहे. आर्थिक बाबतीत देखील हा महिना फारसा उत्तम नाही आहे, म्हणून वायफळ खर्च करणे टाळावे. काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता त्यासाठी खबरदारी घ्या.
धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे)
यश आपली वाट पाहत आहे, बस योग्य संधी ओळखा. कोर्ट-कचेरीपासून सुटका मिळेल. प्रेम-संबंध दृढ होतील. एखाद्याला दिलेले वचन जरूर पाळा. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण साहाय्य प्राप्त होईल. तुम्ही सुख सुविधांच्या वस्तूंची खरेदी कराल. भाऊ बहिणींच्या नात्यात आधीच्या तुलनेत गोडवा येण्याची शक्यता आहे. करियरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल.
मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी)
या महिन्यात ग्रह तुमच्यासोबत आहेत. बिघडलेली कामे होतील. आप्त-स्वकीयांमध्ये लग्नाचे आयोजन होऊ शकेल. वेळेचा योग्य वापर करायला शिका. प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनेरी वेळ आहे. लक्ष्य निर्धारीत करून मेहनतीने ते प्राप्त करण्यासाठी झटा, यश नक्की मिळेल. इतरांनी दिलेले मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास समर्थ स्थितीत राहतील. स्थगित व्यवहार गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गी राहतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. इतरांवर अधिक विश्वासून राहणे अहितकारक ठरण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द)
मिळकतीचे स्त्रोत वाढू शकतात. स्पर्धापरिक्षांमध्ये यश मिळू शकते. या दरम्यान तुम्ही उंच झेप घेऊ शकता, पण कठोर परिश्रमांना तयार असाल तरच तुमच्या सकारात्मक उर्जेचा स्त्रोत निरंतर टिकेल. मित्रांची मदत मिळेल. व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ लोकांचे आणि कुटुंबातील मोठयांचे भरपूर साहाय्य मिळेल. नकोसे खर्चही वाढू शकतात. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. व्यवसायात शत्रुपक्ष तुमच्यावर वर्चस्व साधण्याचा प्रयत्न करेल.
मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)
लहान-मोठया समस्या बाजूला सारल्या तर वेळ तुमच्यासोबत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. 15 तारखेनंतर कुटुंबीयांसोबत वाद होऊ शकतो. इतरांची बाजू नीट ऐकूनच कोणताही निर्णय द्या. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अपत्यप्राप्तीचा सुखद योग आहे. जमीन,घर व स्थावर मालमत्ता खरेदी करताना जास्त गोंधळून जाऊ नका. या महिन्यात तुम्हाला परदेश किंवा एखाद्या दूर जागेवर जाण्याचा योग आहे. आई किंवा कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी तुमचा मन अशांत करू शकते, म्हणून त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.