Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Numerology 2023 नवीन वर्ष कसे राहील, मूलांक 1 ते 9 पर्यंत आपले भविष्य जाणून घ्या

Numerology 2023
, बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (15:02 IST)
मित्रांनो नवीन वर्ष 2023 लवकरच सुरू होणार आहे, चला जाणून घेऊया अंकशास्त्रानुसार नवीन वर्ष आपल्यासाठी कसे असेल?
 
अंकशास्त्रात मूलांकाला विशेष महत्त्व आहे. मूलांक जन्मतारखेपासून ओळखला जातो. हे मूलांक 1 ते 9 पर्यंत असतात, परंतु ज्यांचा जन्म 9 पेक्षा जास्त संख्या असलेल्या तारखेला झाला असेल, त्यांच्या जन्मतारीख एकत्र जोडून मूलांक प्राप्त होतो. जसे एखाद्याचा जन्म 19 तारखेला आहे, तर आपण 1 आणि 9 जोडू, 1+9=10, म्हणजे 10 म्हणजे आपल्याला 1 मूलांक मिळाला.
 
1 ते 9 मूलांकाची स्थिती जाणून घेऊया...
 
मूलांक 1 - महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 1 असतो. 2023 हे वर्ष तुमच्यासाठी चांगले असणार आहे. नवीन वर्ष तुम्हाला काही नवीन काम करायला प्रोत्साहित करु शकेल. अंक 1 असणारे दृढनिश्चयी आणि महत्वाकांक्षी असतात. नि‍श्चित केलेले कार्य पूर्ण केल्यावरच ते शांत बसतात. येत्या नवीन वर्ष 2023 साठी वेबदुनियाचा सल्ला आहे की तुम्ही तुमच्या अहंकाराची प्रवृत्ती टाळा, जर तुम्ही ती टाळली नाही तर तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात. सूर्यदेवाची आराधना करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि यश देखील मिळेल.
 
मूलांक 2 - महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 2 असतो. 2023 हे वर्ष तुमचा सन्मान वाढवेल. तुम्ही स्वभावाने भावनिक आणि कल्पक आहात. या वर्षी तुमची अनेक लोकांशी ओळख होणार आहे, त्यामुळे वेबदुनियाच्या माध्यमातून तुम्हाला सल्ला दिला जात आहे की तुम्ही जास्त भावनिकता टाळा आणि तुमच्या कामात अधिक लक्ष द्या. तुम्हाला यश नक्की मिळेल, चंद्रदेवाची पूजा-अर्चा करा, तुम्हाला लाभ होईल.
 
मूलांक 3 - ज्यांचा जन्म महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झाला आहे त्यांचा मूलांक 3 असतो. 2023 मध्ये तुमच्या कामात प्रगती होईल आणि तुम्ही जे काही काम करत आहात ते पूर्ण करू शकाल. तुम्ही खूप सर्जनशील आहात. तुम्ही एक चांगले लेखक, अभिनेता आणि गायक असू शकता. तुम्ही निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ओळखले जाता. तुमची सर्वात मोठी खासियत म्हणजे तुम्ही कधीही नकारात्मक विचार करत नाही. नेहमी आशावादी राहणार्‍या या मूलांकच्या जातकांना वेबदुनियाच्या माध्यमातून सल्ला आहे की येत्या नवीन वर्षासाठी तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करा. स्वतःला परिष्कृत करा. जेणेकरून इतर तुमच्याकडे आकर्षित होतील. गुरु ग्रहाची पूजा आणि उपासना करा, तुम्हाला अनेक फायदे होतील.
 
मूलांक 4 - ज्यांचा जन्म महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला होतो त्यांचा मूलांक 4 असतो. या मूलांकचे लोक खूप मेहनती आणि नातेसंबंधात प्रामाणिक असतात. येणारे वर्ष 2023 हे वित्त, बँक आणि व्यवस्थापन क्षेत्राशी निगडित लोकांना खूप मोठे यश देणारे ठरु शकते. तुमची अनेक लोकांशी मैत्री होईल, पण तुमची गरज असताना त्यांचा उपयोग मात्र होणार नाही. 2023 या वर्षासाठी वेबदुनियाचा सल्ला आहे की तुम्ही अतिआत्मविश्वास टाळा आणि समर्पणाने तुमचे काम करा, यश नक्कीच मिळेल. 4 मूलांकावर राहू ग्रहाचा प्रभाव आहे, त्यामुळे देवी सरस्वतीची पूजा आणि आराधना करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
 
मूलांक 5 - ज्यांचा जन्म महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला होता त्यांचा मूलांक 5 असतो. हे लोक खूप लवकर मैत्री करतात. निर्णय घेण्यात तरबेज असतात. त्यांना त्यांच्या जीवनशैलीत सतत बदल आवडतात. येत्या नवीन वर्ष 2023 मध्ये तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. व्यवसाय, विपणन आणि विक्रीमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. काही मानसिक तणाव राहील. प्रवासाची शक्यताही आहे. नवीन वर्षासाठी वेबदुनियाच्या माध्यमातून सल्ला आहे की तुम्ही या वर्षी तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्य चांगले ठेवा. मूलांक 5 यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे, म्हणून गणपतीची पूजा करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
 
मूलांक 6 - महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 6 असतो. या मूलांकचे लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात. हे लोक चांगले कलाकार, सौंदर्य प्रेमी असतात. जबाबदार नागरिक असतात. येणारे नवीन वर्ष 2023 तुम्हाला एक नवी ओळख देईल. तुमची विश्वासार्हता वाढेल. जीवनात नवीन लोक सामील होतील. शिक्षण आणि समाजाशी संबंधित उपक्रम तुम्हाला उंचीवर घेऊन जातील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नवीन वर्षासाठी वेबदुनियाच्या माध्यमातून सल्ला दिला जात आहे की तुम्ही जे काही काम कराल ते विचारपूर्वक करा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. मूलांक 6 वर शुक्राचा प्रभाव असल्याने तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा करावी. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
 
मूलांक 7 - ज्यांचा जन्म महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला होतो त्यांचा मूलांक 7 असतो. त्यांच्या चंचल स्वभावामुळे त्यांना प्रवास आणि बदल आवडतात. ते चांगले चित्रकार आणि तत्वज्ञ असू शकतात. 7 मूलांक नवीन वर्ष 2023 चे नेतृत्व करेल. नवीन वर्षात अध्यात्मिक कार्याचा आनंद घ्याल. आपण बर्याच काळापासून जे साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहात ते आपल्याला मिळेल. तुम्ही एकांतात राहणे पसंत कराल. नवीन वर्षासाठी वेबदुनियाच्या माध्यमातून सल्ला दिला जात आहे की तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते तुम्ही आंत्मविश्वासाने आणि ठामपणे बोला आणि कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मूलांक 7 वर केतू ग्रहाचा प्रभाव आहे, त्यामुळे श्री गणेशाची पूजा आणि आराधना करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
 
मूलांक 8 - महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 8 असतो. हे लोक खूप हट्टी स्वभावाचे असतात. त्यामुळेच त्यांचा अनेकदा गैरसमज होतो. ते त्यांच्या भावना लपवून ठेवतात. तुम्ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात यशाच्या शोधात असता. 2023 मध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवातून बरेच काही शिकू शकाल. मित्रांसोबत खूप वेळ घालवाल आणि आनंदी राहाल. नवीन वर्षात 8 मूलांकाच्या लोकांचा व्यवसाय खूप चांगला राहील. नववर्षानिमित्त वेबदुनियाच्या माध्यमातूनसल्ला आहे की तुम्ही तुमचा जिद्द आणि हट्टीपणा सोडून तुमचे काम नम्रपणे आणि शांततेने करत राहा. अंक 8 वर शनिदेवाचा प्रभाव आहे, त्यामुळे तुम्ही शनिदेवाची पूजा-अर्चा करा, तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल.
 
मूलांक 9 - महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 9 असतो. या राशीचे लोक प्रेमाला खूप महत्त्व देतात. हे लोक जीवनात जे मिळवायचे आहे त्यासाठी खूप संघर्ष करतात आणि यशस्वी होतात. ते जास्त राग आणि कट्टरता प्रवण आहेत. नवीन वर्ष 2023 मध्ये तुम्ही लोकांना खूप मदत कराल. जीवनात आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागेल. विज्ञान, राजकारण, कायदा या क्षेत्रांत चांगले यश मिळेल. नवीन वर्ष 2023 साठी वेबदुनियाद्वारे सल्ला दिला जात आहे की तुम्ही तुमच्या पैशाचा योग्य वापर करा. तुम्ही तुमच्या पैशाचे योग्य व्यवस्थापन केल्यास, तुम्ही यशस्वी व्हाल. 9 या अंकावर मंगळाचा प्रभाव आहे, त्यामुळे हनुमानाची पूजा करावी. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दै‍निक राशीफल 23.11.2022