अयोध्येचा निकाल द्यायचा का नाही, तसेच यानंतर निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याने देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालय आज सकाळी रामचंद्र त्रिपाठी यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. यानंतर दुपारी अयोध्या निकालावर सुनावणी करण्यात येण्याची शक्यता आहे.
अयोध्येचा विषय अत्यंत ज्वलंत प्रश्न असल्याने देशभरात या विषयी अतिदक्षता घेतली जात आहे. अनेक संवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था वाढवली जात असून, तणाव कमी करण्यासाठी सद्भावना रॅली काढल्या जात आहेत.