Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मायावती म्हणतात, केंद्राने कारवाई करावी!

मायावती म्हणतात, केंद्राने कारवाई करावी!

वेबदुनिया

लखनौ , गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (18:13 IST)
अयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आता नेत्यांनी याचे राजकारण करण्‍यास सुरुवात केली असून, उत्तर प्रदेशच्या मुख्‍यमंत्री मायावती यांनी या प्रकरणातून अंग काढत आता ‍न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी ही केंद्र सरकारची असल्याचे म्हटले आहे.

या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र पाठवण्‍यात आले असून, न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार वादग्रस्त जागेवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास केंद्र सरकारने जर उशिर केल्यास राज्यात अप्रिय घटना घडल्यास ही जबाबदारीही केंद्राचीच असल्याचेच मायावतींनी म्हटले आहे.

केंद्र सरकारवर ताशेरे ओढतानाच मायावती यांनी लखनौमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर तोंडसूख घेतले.


Share this Story:

Follow Webdunia marathi